Truck Rickshaw Accident saamtv
महाराष्ट्र

Beed Accident: भीषण अपघात;भरधाव ट्रकची रिक्षाला जबर धडक; ६० फुटांपर्यंत फरफटत नेलं, ४ जणांचा मृत्यू

Truck Rickshaw Accident: भरधाव ट्रकनं रिक्षाला धडक दिल्यानंतर रिक्षा ५० ते ६० फुटापर्यंत फरफटत गेली. हा अपघात बीड जिल्ह्यातील तेलगाव- माजलगाव रस्त्यावर झाला. यात ४ जणांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात अपघाताच्या घटना सतत होतायेत. आज पुन्हा बीड जिल्ह्यात एक भीषण अपघात झालाय. हा भीषण अपघात माजलगाव तालुक्यातील निन्नूड परिसरातील तेलगाव- माजलगाव रस्त्यावर झाला. भरधाव ट्रकनं रिक्षाला ६० फुटापर्यंत फरफटत नेलं. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झालाय तर २ जण गंभीर जखमी झालेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, मृत पावलेले व्यक्ती सिरसाळा येथील आहेत. त्यांची नावेदेखील जाहीर करण्यात आली आहेत. फारूख चाँद सय्यद, शबाना फारूख,शेख नोहिद एजाज आणि फैजान रफिक सय्यद अशी मृतांची नावे आहेत. अपघातस्थळी दिंद्रुड पोलीस दाखळ झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बीडच्या गढी पुलावर आयशरच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला होता.

भरधाव आयशर ट्रकनं रिक्षाला धडक दिल्यानंतर रिक्षाला ५० ते ६० फुटापर्यंत फरफटत नेलं. या भीषण अपघातात ४ प्रवाशी मृत पावलेत. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक तेथून फरार झालाय. ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झालाय. रिक्षाचे मोठं नुकसान झाले आहे.

महामार्गावर पडलेल्या दोघांना कारने चिरडलं

भंडाऱ्यातील साकोली येथे विचित्र अपघात झाला. दुचाकीला ऑटोनं जोरदार धडक दिली, त्यामुळे दोघे महामार्गावर पडले. त्या दोघांना डस्टर कारने जोरात धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. या विचित्र अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर उकारा फाट्याजवळ हा विचित्र अपघात झाला.

मृतक गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील यादवराव गोपालराव वघारे (वय ३६, रा. आमगाव) आणि जितेंद्र रवींद्र उपराडे (वय २८, रा. मोहनटोला) हे दोघे मोटरसायकलने नागपूरकडे रोजगाराच्या शोधात निघाले होते. वाटेतच त्यांचा अपघातात मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT