Beed News
Beed News Saam Tv
महाराष्ट्र

संतापजनक! 'गुड मॉर्निंग' म्हटलं म्हणून शिक्षकाने 40 विद्यार्थ्यांसोबत केलं भयंकर कृत्य, बीडमधील घटना

विनोद जिरे

बीड - कधी कुणाला आणि कशाचा राग येईल सांगता येत नाही. अशीच घटना बीडच्या (Beed) परळी मध्ये उघडकीस आली विद्यार्थ्यांनी सकाळी सकाळी जोरात गुड मॉर्निंग म्हटलं म्हणून शिक्षकाच्या डोक्यातील अळी सरकली आणि चक्क विद्यार्थ्यांना (Student) मारहाण करत सुटला. यामध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई (Ambajogai) येथे उपचार सुरू आहेत.या प्रकरणात शिक्षकावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beed Latest News)

शिक्षकाला पाहून आदराने गुड मॉर्निंग म्हणणाऱ्या 8 वीच्या 40 विद्यार्थ्यांना शिक्षकाने व्हेरी गुड मॉर्निंग म्हणण्याऐवजी चक्क छडी हातात घेत बेदम मारहाण केलीय. ही धक्कादायक घटना बीडच्या परळी येथील नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घडलीय. हा प्रकार कळताच तुम्ही विद्यार्थ्यांना का मारहाण केली याचा जाब विचारणाऱ्या संस्थाचालकासही शिक्षकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. बालाजी लक्ष्मण फड असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. संस्थाचालकांनी या शिक्षकावर कायदेशीर बाजू तपासून कारवाई करणार असल्याचे सतीश खाडे संस्था चालकांनी सांगितले.

परळी शहरातील वडसावित्रीनगर भागात मराठवाडा ऊसतोड कामगार मंडळ परळी संचालित नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे. दोन दिवसा पूर्वी सकाळी अकरा वाजता शाळेतील शिक्षक बालाजी लक्ष्मण फड हे आठवीच्या वर्गात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेले होते. शिक्षक वर्गात आल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी आदराने त्यांना “गुड मॉर्निंग सर..’असे एका सुरात म्हणत त्यांचे स्वागत केले.

परंतु फड यांनी विद्यार्थ्यांना “व्हेरी गुड मॉर्निंग’ असे म्हणण्या ऐवजी चक्क हाती छडी घेत वर्गातील काही विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. यात एका विद्यार्थ्याच्या हाताला जबर मार लागला असून त्याला उपचारासाठी अंबाजोगाईला पाठवले आहे.

शाळेमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली एवढ्यावरच थांबले नाही तर संस्थाचालकांना त्यांना विचारले असता त्यांना देखील आले-रावीची भाषा केली याप्रकरणी संस्थाचालकांनी शिवाजी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी करुन कारवाई केली जाईल असं वस्तीग्रह अधीक्षक विष्णू फड यांनी सांगितल

मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण मारणारा शिक्षकाला नेमकं झालं काय हा प्रश्न पोलीस प्रशासनाला पडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Shekhar Suman joins BJP: अभिनेते शेखर सुमन यांनी केला भाजपा पक्षात प्रवेश

Baramati Lok Sabha: बारामतीकरांना ४ जूनला गोड बातमी मिळेल; आमदार रोहित पवारांना विश्वास

सातारा लाेकसभा मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, Video

Baramati News | EVM वर कमळाचं चिन्हच नाही, बारामतीचे आजोबा संतापले

Live Breaking News : Raigad Breaking : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार

SCROLL FOR NEXT