beed Saam
महाराष्ट्र

Beed: गाडीचा धक्का अन् हॉर्न का वाजवला? बीडमध्ये भररस्त्यावर धारदार शस्त्राने हाणामारी; CCTV व्हायरल

Beed latest crime news: क्षुल्लक कारणावरून भरचौकात धारदार शस्त्र आणि दगडांनी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

बीडमध्ये सध्या गुन्हेगाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाहनाचा धक्का आणि हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून भररस्त्यावर हाणामारीचा प्रकार घडला. धारदार शस्त्रांसह दगडांनी उघडपणे मारहाण करण्यात आली. या प्रकाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बीड शहरातील साठे चौकात हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चार व्यक्तींमध्ये वाहनाला धक्का लागल्याचा आणि हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून वाद झाला होता. पाहता पाहता वाद विकोपाला गेला आणि दगड आणि धारदार हत्यारांचा वापर करत एकमेकांवर हल्ले करण्यात आले.

या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एकजण दगड मारताना दिसतोय तर दोघांच्या हातामध्ये कोयत्यासारखे हत्यारं असल्याचं दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणीत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अंबरनाथमध्ये सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला

अंबरनाथमध्ये गनी रफिक शेख या सराईत गुन्हेगारावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ऋतिक राजू महाडिक याच्यासह ७ ते ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या हल्ल्यानंतर काही महिन्यांपूर्वी महाडिकांच्या कार्यालयावर झालेल्या तलवार हल्ल्याचा बदला घेण्यात आला का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण या हल्ल्याप्रकरणी गनी शेखवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे हा हल्ला पूर्वीच्या वादातून सूडबुद्धीने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

SCROLL FOR NEXT