विभागीय नियंत्रकाच्या नोटीसने ST कर्मचाऱ्याला चक्कर; रुग्णालयात दाखल
विभागीय नियंत्रकाच्या नोटीसने ST कर्मचाऱ्याला चक्कर; रुग्णालयात दाखल  Saam TV
महाराष्ट्र

विभागीय नियंत्रकाच्या नोटीसने ST कर्मचाऱ्याला चक्कर; रुग्णालयात दाखल

विनोद जिरे

बीडमध्ये विभागीय नियंत्रकांनी बडतर्फीची नोटीस काढल्यानंतर, कर्तव्यावर जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचा बीपी हाय झाला आहे. यामुळे बीड आगारामध्ये कर्मचारी चक्कर येऊन कोसळला आहे. निवृत्ती गायकवाड असं वाहक असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. निवृत्ती गायकवाड हे वाहक म्हणून काम करतात, ते 11 महिन्याच्या ऑफरवर आहेत. त्यामुळे त्यांना विभागीय नियंत्रक मोरे यांनी, तात्काळ कामावर हजर राहावे, अन्यथा बडतर्फ करू, असा इशारा दिला होता. त्यामुळे काही वेळापूर्वी निवृत्ती गायकवाड हे कर्तव्यावर जात असताना, त्यांचा बीपी हाय झाला आणि याच दरम्यान ते बीड आगारांमध्ये चक्कर येऊन कोसळले. दरम्यान गायकवाड यांना ॲम्बुलन्सच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात रवाना केलं असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अगोदर कर्मचाऱ्यांनी स्थानीक पातळीवर संप केला त्यांनतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा मुंबईतील आझान मैदानावर धडकला. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी मुंबईत तळ ठोकून आहेत. सरकारकडून कर्मचाऱ्यांना विविध पर्याय दिले जात आहेत परंतु कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत यासारख्या नेत्यांना कर्मचाऱ्यांना खंबीर पाठिंबा आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: चेहऱ्यावर कोरियन ट्रिटमेंट सारखा ग्लो हवाय? मग मधासोबत 'या' गोष्टी अप्लाय करा

Akola Crime: खिडकीतून आतमध्ये प्रवेश... अकोल्यात प्रसिद्ध उद्योजकाचे घर फोडले; २ कोटींचा मुद्देमाल लंपास

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये जाहीर सभा

Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

Pune Travel : पुण्यातील नयनरम्य निसर्ग; हनिमून आणि डेटसाठी परफेक्ट ऑप्शन असलेली भन्नाट ठिकाणे

SCROLL FOR NEXT