Beed Saam Tv
महाराष्ट्र

Beed: एसटी चालकाचा लेक झाला सरकारी अधिकारी! MPSC त झेंडा रोवला, अख्ख्या बीडमध्ये होतेय कौतुक

Success Story Of Beed ST Driver Son Crack MPSC: बीडच्या एसटी चालकाच्या मुलाने एमपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. फक्त त्यानेच नव्हे तर आष्टी तालुक्यातील ७ जणांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकारी अधिकारी होण्याची अनेकांची इच्छा असते. प्रशासकीय सेवेत काम करुन काहीतरी करण्याचे स्वप्न त्यांचे असते. यासाठी अनेक गावाखेड्यातील मुले एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देतात. या स्पर्धा परीक्षांमध्ये फार कमी लोकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळते. परंतु कितीही अपयश आले तरीही पुन्हा प्रयत्न करणारा व्यक्ती नक्कीच यशस्वी होतो. असंच यश बीडच्या आष्टी तालुकांना तरुणांना मिळालं आहे. तालुक्यातून ७ जणांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. त्यातील एक मुलगा एसटी चालकाचा लेक आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यातील एसटी चालकाच्या मुलाने एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज करून दाखवले आहे. या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा होतोय. विशेष बाब म्हणजे एकट्या आष्टी तालुक्यातून सात जणांची एमपीएससीतून महसूल सहायक पदी निवड झाली आहे.

पाटोदा तालुक्यातील पाटसरा येथील पोपट गर्जे एसटी महामंडळात चालक आहेत. मुलाला खडतर परिस्थितीत उच्च शिक्षण देऊन त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. ग्रामीण भागातील नितीन गर्जे याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत महसूल सहाय्यक पदी गवसणी घातली आहे. गावी पोहोचताच त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आई-वडिलांनी मुलाच्या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा करण्यात आला.

आपल्या मुलाने काहीतरी करावं, खूप मोठं व्हावं, असं प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असतात. त्यासाठी मुलं दिवसरात्र मेहनत करुन अभ्यास करतात. एसटी चालकाच्या मुलाचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्याने खूप मेहनत करुन हे यश मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT