Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: बीडकरांनो सावधान! तुमच्या किचनमध्ये शौचालयात ठेवलेला भाजीपाला तर नाही ना?

Beed Marathi News: बीडच्या भाजीमंडई मधील धक्कादायक अन् संतापजनक प्रकार...

विनोद जिरे

Beed News Today: बीडकरांनो तुमच्या किचनमध्ये शौचालयात ठेवलेला भाजीपाला तर नाही ना ? असं म्हणण्याची संतापजनक आणि धक्कादायक बातमी बीडमधून समोर आली आहे. बीड शहरातील भाजी मंडईत असणाऱ्या महिला शौचालयात, भाजीमंडईत दिवसा विक्री केला जात असणारा भाजीपाला ठेवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

या शौचालयाच्या बाजूला भाजीपाला व्यापारी आपली दुकान थाटून बसतात. दिवसभर भाजीपाला विकला जातो आणि रात्री दहा साडेदहा नंतर उरलेला भाजीपाला बाजूलाच असणाऱ्या नगरपालिकेच्या महिला शौचालयामध्ये ठेवण्यात येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच भाजीपाला आपल्या भाजीपाल्याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात येतो. (Beed News)

नगरपालिकेने हे शौचालय महिलांसाठी बांधलं आहे. मात्र या शौचालयाचा रात्रीच्या वेळी हा भाजीपाला विक्रेता जणूकाही कोल्ड स्टोरेज म्हणून या वापर करतोय की काय ? असं वाटू लागलं आहे.

विशेष म्हणजे स्वच्छ बीड सुंदर बीड असा नारा बीड नगरपालिका देत आहे. मात्र याच नगरपालिकेने महिलांसाठी बांधलेल्या शौचालयात भाजीपाला विक्रेता आपला भाजीपाला ठेवतोय. आणि तोच भाजीपाला बीडकरांना विकून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, या घटनेने बीड (Beed) शहरात एकच खळबळ उडाली असून बीडकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता नगरपालिका आणि अन्न औषध प्रशासन यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT