Beed Shocking News  Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News: जिवंत बाळ डॉक्टरांकडून मृत घोषित, अंत्यसंस्काराच्या वेळी चमत्कार? बाळ लागलं रडू; पाहा VIDEO

Beed New Born Baby: बीडमध्ये अंत्यसंस्कारावेळी मृत घोषीत केलेले बाळ अचानक रडू लागले. त्यामुळे उपस्थित आश्चर्यचकीत झाले. बाळ जिवंत झाल्यामुळे आई-वडिलांना आनंद झाला. पण या घटनेमुळे बीडमधील आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Priya More

भरत मोहोळकर, साम टीव्ही

बीडमधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मृत घोषित केलेलं नवजात बाळ अचानक जिवंत झाल्याचे समोर आलं आहे. जिवंत बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंत्यसंस्काराच्या वेळी अचानक चमत्कार झाला आणि बाळ रडू लागलं. त्यामुळे उपस्थित आश्चर्यचकीत झाले. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

बीडच्या अंबाजोगाईत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडलीय.. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या हलगर्जीपणा पाहून संतापाचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही...कारण महिलेच्या प्रसुतीनंतर डॉक्टरांनी नवजात बालक मृत असल्याचं घोषित केलं.. त्यानंतर घुगे कुटुंबाला दु:ख अनावर झालं. बाळाचे आजोबा अंत्यसंस्काराची तयारी करत होते. बाळाची आईनं हंबरडा फोडला होता. मात्र अचानक चमत्कार व्हावं असच घडलं. चक्क डॉक्टरांनी निष्काळजीपणे मृत घोषित केलेलं बाळ जिवंत असल्याचं उघड झालं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. या घटनेमुळे हॉस्पिटलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय.

अंत्यसंस्कारावेळी बाळ जिवंत असल्याचं दिसून आल्यानंतर बाळाच्या नातेवाईकांनी पुन्हा हॉस्पिटल गाठलं.. आणि बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आलेत... मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रामानंद तीर्थ हॉस्पिटलची लक्तरं वेशीवर टांगली गेली..तर आरोग्य खात्याने उरली सुरली इभ्रत वाचवण्यासाठी 2 चौकशी समितीची स्थापना केलीय.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या वारंवार समोर येतात...ज्यांच्यावर रुग्णांना वाचवण्याची जबाबदारी असते त्याच डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकला जीव गेला असता. त्यामुळे आरोग्य खात्याने कागदी घोडे नाचवून चौकशी करण्यापेक्षा अशा घटना घडणारच नाहीत आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अशा डॉक्टरांना चाप लावण्यासाठी कठोर धोरण आखण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT