beed crime news Saam tv
महाराष्ट्र

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

beed crime news : बीड पुन्हा हादरलंय. कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Vishal Gangurde

बीडच्या तांबवामध्ये तरुणावर भीषण हल्ला

हल्लेखोरांनी आधी डोळ्यात मिरची पावडर टाकून केली मारहाण

पीडित संग्राम चाटे गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमधील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बीडमध्ये पुन्हा दादागिरी पाहायाला मिळू लागलीये. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील बहुतेक आरोपींना अटक केली आहे. तर आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. या हत्याकांडातील आरोपी जयराम चाटे भावाच्या बारावाच्या धार्मिक विधीकरिता तुरुंगतातून बाहेर आला होता. त्यादरम्यान बीडमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आलं आहे.

बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात गुरुवारी दुपारी पाच जणांनी संग्राम चाटे नामक तरुणाला अडवलं. त्यानंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केला आहे. मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे याचे नाव घेऊन धमकावण्यात आले.

'तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो, असे म्हणत पाच जणांनी हल्ला केलाय. यामध्ये तरूण संग्राम चाटे गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी केज पोलिसात पाच आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आज शुक्रवारी एक दिवसासाठी जेलच्या बाहेर आलेला आहे. तांबवा येथे तो भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी पोहोचला आहे. तो बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या टोळीतील सदस्यांकडून गाव परिसरात तरुणावर हल्ला करत दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक, अडीच तासांपासून मुंबई- बंगळुरू महामार्ग पूर्णत: बंद; VIDEO

Crime News: भयंकर! पतीनं परदेशात दुसरीसोबत लग्न केलं; रागाच्या भरात पहिल्या पत्नीनं पोटच्या ४ मुलांना संपवलं

मोठी बातमी ! तरुण न्यायाधीशांनी आयुष्य संपवलं; बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Accident: धावत्या कारवर कोसळलं भलं मोठं झाड, ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT