परळी विषारी दारूमुळे तरुणाचा मृत्यू
तरुण हातभट्टीची दारू प्यायला होता
या घटनेनंतर परळी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन
दारू विक्रेत्यावर मनुष्यवध गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुण्यामध्ये विषारी दारूमुळे २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्ये देखील अशीच घटना घडली. बीडच्या परळीमध्ये हातभट्टीची विषारी दारू प्यायल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तरुणाच्या नातेवाईकांनी परळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. दारूबंदी करा अथवा मृतदेह पोलिस ठाण्यात आणून ठेवू असा आक्रमक पवित्रा तरुणाच्या नातेवाईकांनी घेतला आहे. दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नातेवाईकांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळी शहरात पुण्यासारखी पुनरावृत्ती झाली. पुणे शहरात हातभट्टी दारूमुळे अनेक तरुणांचा झाला होता. या घटनेनंतर बीडच्या परळी शहरात पुणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. शहरातील साठे नगर भागात एका तरुणाचा विषारी हातभट्टी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाला. या तरुणांच्या मृत्यूमुळे परळीत एकच खळबळ उडाली.
तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी परळी पोलिस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला. अनेक वेळा दारूबंदीसाठी निवेदन देत मोर्चे काढले गेले. पण पोलिसांनी कसल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आज एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या दारू विक्रीकडे परळी पोलिसांचे कायमच दुर्लक्ष झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. दारूबंदी करावी म्हणून अनेक वेळा साठेनगर भागातील नागरिकांनी मोर्चे काढले अनेक निवेदन दिले मात्र जाणून-बुजून परळी पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या तरुणाच्या मृत्यूला परळी पोलिस जबाबदार असल्याची नातेवाईकांची संतप्त प्रतिक्रिया दिली. आजपर्यंत परळी पोलिसांनी कुठल्याही हातभट्टी दारूवर कारवाई केली नसल्याने खुलेआम हातभट्टी दारू विक्री सुरू होते. नागरिकांनी वारंवार पोलिस ठाण्याला माहिती देऊन सुद्धा साठेनगर भागातील अंमलदार यांनी दुर्लक्ष केले आहे असे साठेनगर भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. पुण्यामधील घटनेत दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच प्रकारे या तरुणाचा सुद्धा मृत्यू झाला आहे. त्यामुळे साठेनगर भागातील दारू विक्रेत्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन साठेनगर मधील महिला आणि नागरिकांनी दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.