बीडमध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुखांवर भर रस्त्यावर जीवघेणा हल्ला...  विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडमध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुखांवर भर रस्त्यावर जीवघेणा हल्ला...

मंत्र्यासमोर पक्षातील पदाधिकाऱ्यांविषयी बोलल्यानं हल्ला झाल्याचा संशय..

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये Beed शिवसेना ShivSena उपजिल्हाप्रमुख यांच्यावर जीवघेणा Attack हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बीड- परळी Parli महामार्गावरील घोडका Ghodka राजुरी Rajuri परिसरात हा हल्ला झाला आहे. हनुमान जगताप असे जखमी शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे नाव आहे. त्यांच्यावर बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात hospital उपचार सुरू आहेत. तर या विषयी जखमी हनुमान जगताप म्हणाले, की २ दिवसापूर्वी शिवसेना मंत्री संदीपान भुमरे बीडमध्ये आले असता, त्यांच्यासमोर मी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांसह इतर सत्ताधार्यां विषयी तक्रार केली होती. आणि त्याच्यानंतर मला ही मारहाण करण्यात आली आहे.

असा संशय जखमी हनुमान जगताप यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावर उपस्थित असलेले आणि भांडण सोडणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने घडलेला प्रकार सांगितले आहे. यामध्ये मारहाण करणारा हातात तलवार होती, असे देखील घटनास्थळी उपस्थित असलेल्या सदाशिव किसन सानप यांनी सांगितले आहे. सदाशिव किसन सानप हे हनुमान जगताप यांच्यासोबत गाडीवरती होते. राजकीय द्वेषापोटी माझ्या नवऱ्याला मारहाण केली आहे.

हे देखील पहा-

यापूर्वी त्यांचे ३ ते ४ ऑपरेशन झाले आहेत. कोरोना मधून आत्ताच सुखरूप बाहेर आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सत्ताधारी कार्यकर्ते यांनी मिळून आज माझ्या नवऱ्याला मारहाण केली आहे, असा आरोप हनुमान जगताप यांच्या पत्नी उर्मिला जगताप यांनी केले आहे. या घटनेनंतर उशिराने जिल्हा रुग्णालयात भेटण्यासाठी आलेल्या, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर, जखमी हनुमान जगताप यांच्या नातेवाइकांनी, तुम्हीच यामध्ये सहभागी आहे. तुम्ही हे सगळे काही केले आहे. असा थेट आरोप खांडे यांच्यावर नातेवाईकांनी केला आहे.

यावेळी जिल्हा रुग्णालयात जवळपास अर्धा तास गोंधळ सुरू होता. याविषयी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, यातील आरोपी अद्याप निष्पन्न नाहीत. मात्र, हे सर्व आरोपी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून त्यांनीच हनुमान जगताप यांच्यावर हल्ला केला आहे. यामुळे आता आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा, आणि आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करा. अशी मागणी करणार आहोत. अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख खांडे यांनी दिली आहे.

गेल्या ८ दिवसापासून शिवसेना मधील अंतर्गत पूर थेट मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोर व्यक्त झाली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख पैसे कमावण्याच्या नादात पक्षाकडे लक्ष देत नाहीत, अशी तक्रार देखील उपजिल्हाप्रमुख यांनी केली होती. या नंतर हा प्रकार घडल्याने पुन्हा शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार? याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून लक्ष लागले आहे.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड - गेवराईमध्ये घर जळून खाक, कुटुंब देवदर्शनाला गेल्याने जीवितहानी टळली

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ, मंत्रिमंडळ बैठकीत ४ धडाडीचे निर्णय

IPPB Jobs : पोस्टात बक्कळ पगाराची नोकरी, पण अट फक्त एकच; पाहा कुणाला करता येणार अर्ज

Famous Actor Death: हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेता हरपला; मनोरंजन विश्वावर शोककळा

Lohagad Fort : सह्याद्रीतील लोखंडी किल्ला! लोहगड किल्ल्याच्या नावाचा इतिहास तुम्हाला माहितेय का?

SCROLL FOR NEXT