Beed Shirur Satish Bhosale Helicopter Hotel Video Viral Saam Tv News
महाराष्ट्र

Satish Bhosale : गरिबाला अमानुष मारहाण, कारमध्ये नोटांची बंडलं, हेलिकॉप्टरने एन्ट्री; सतीश भोसलेचे आणखी व्हिडिओ व्हायरल

Satish Bhosale Viral Video : सतीश भोसले हा गेल्या पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील तो रहिवासी आहे.

Prashant Patil

बीड : बीडमधील शिरूर तालुक्यातील एका गरीब व्यक्तीला बेदम केली असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसलेने त्याच्या काही मित्रांसोबत मारहाण केली असून तो भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आहे. यानंतर सतीश भोसलेचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात तो नोटांचे बंडलं कारच्या डॅशबोर्डवर टाकताना दिसत आहे. यानंतर सतीश भोसलेचा तिसरा व्हिडिओ व्हायरल झाला. तो थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता सतीशचा चौथा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तो एका आलिशान हॉटेलमध्ये व्हिआयपी माणसासारखा बाथरुमधून निघताना दिसत आहे. त्यामुळे सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सतीश भोसले हा गेल्या पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील तो रहिवासी आहे. भाजपच्या महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली, तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केलं. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. आमदार सुरेश धस यांच्याशी संपर्क वाढल्याने त्याची जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात त्याचा दबदबा निर्माण झाला. आता गेल्या २४ तासात त्याचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सतीश भोसले याची चर्चा सुरू झाली आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक करा आणि आमदार सुरेश धस यांच्यावर देखील गुन्हा नोंद करा अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी शिरूर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. बीडच्या शिरूर पोलीस ठाण्याबाहेर सतीश भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बावी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. जोपर्यंत सतीश भोसले आणि आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. शिरूर येथील खोक्या नावाच्या गुंडाने बावी गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT