Satish Bhosale remanded in police custody Saam Tv News
महाराष्ट्र

Satish Bhosale : खोक्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी, तुरुंगात डांबण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात काय सांगितलं?

Satish Bhosale Police Custody : सतीश भोसले हा बीडमधील जातीय राजकारणाचा बळी ठरला आहे. आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसलेवर काढला जात आहे.

Prashant Patil

बीड : मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला आज शुक्रवारी प्रयागराजवरुन छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर खोक्याला शिरुर-कासार येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. या सुनावणीअंती न्यायालयानं खोक्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता २० मार्चपर्यंत खोक्याचा मुक्काम पोलीस कोठडीत असेल. यावेळी सतीश भोसले याच्या वकिलांनीही आपली बाजू मांडली.

खोक्याच्या वकिलांनी काय सांगितलं?

सतीश भोसले हा बीडमधील जातीय राजकारणाचा बळी ठरला आहे. आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसलेवर काढला जात आहे. सतीश भोसले हा एका आमदाराचा कार्यकर्ता आहे. तो पारधी समाजाचा असल्याने त्याच्यावर कारवाई केली जात आहे. एखाद्या मागासवर्गीयाने आमदाराचा कार्यकर्ता होऊ नये का? बीडमध्ये सध्या जे काही जातीचं राजकारण सुरू आहे त्याचा सतीश भोसले हा बळी ठरला आहे, असे खोक्या भाईचे वकील अंकुश कांबळे यांनी सांगितले. दरम्यान, आता पुढच्या सुनावणीला पोलीस कोर्टात काय माहिती देणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

पोलिसांनी कोठडीसाठी न्यायालयात काय सांगितलं?

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून यात या आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग आहे

मारहाण करताना कुऱ्हाड आणि सत्तुर जप्त करायची आहे. त्यासाठी आरोपीची आम्हाला पोलीस कोठडी पाहिजे

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे इतर गुन्हेगारांशी काही संबंध आहेत का? हे तपासायचं आहे

सदर गुन्हा हा शारीरिक आणि गंभीर स्वरूपाचा असून सदर गुन्ह्यात आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची तक्रार असल्याने पुण्यामध्ये वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची कार तपासणी कामी जप्त करायची आहे

सदर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यातील सर्व आरोपी फरार आहेत

यातील आरोपी फरार असताना त्याला फरार होण्यासाठी कोणी कोणी मदत केली? याचा तपास करायचा आहे

याव्यतिरिक्त नमूद गुन्ह्यात आरोपीच्या सहभागाची सखोल चौकशी करायची आहे म्हणून पोलीस कोठडी हवी आहे

आम्हाला पोलिसांची कायदेशीर चौकशी मान्य आहे. पण बुलडोझरने आमचं घर पाडणं योग्य नव्हतं. आमचं घर पाडल्यानंतर चार ते पाच दिवसांनी ते पेटवून देण्यात आल्याची बातमी आली. त्यामुळे आम्ही आज इतक्या तात्काळ शिरु-कासारा गावात आलो. घर पेटवून देताना घरातील लहान मुलींनाही मारण्यात आलं. त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे आता सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सतीश भोसलेच्या बहिणीने केलीय .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT