Santosh Deshmukh murder Case SaamTV
महाराष्ट्र

मृतदेह त्यांना लपवायचा होता, त्यांनी एक महिला...; संतोष देशमुख हत्या प्रकरणात ग्रामस्थांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supriya Sule on Santosh Deshmukh Murder Case : आम्ही जायच्याआधी पोलिसांनी तिथे रुग्णवाहिका बोलावली. ती रुग्णवाहिका केजकडे न आणता कळमकडे वळवली, असं वैभवी हिने सुप्रिया सुळेंशी बोलताना सांगितलं.

Prashant Patil

बीड : बीडमधील मस्साजोग येथील दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच पेटलेलं आहे. आज मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे, मेहबुब शेख यांनी मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी बीड पोलिसांवर गंभीर आरोप लावलेला आहे. संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याचा प्लॅन बीड पोलिसांचा असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख म्हणाली की, माझ्या वडिलांचा मृतदेह तिथे असल्याचं जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं, तेव्हा आम्ही जायच्याआधी पोलिसांनी तिथे रुग्णवाहिका बोलावली. ती रुग्णवाहिका केजकडे न आणता कळमकडे वळवली, असं वैभवी हिने सुप्रिया सुळेंशी बोलताना सांगितलं.

मृतदेह त्यांना लपवायचा होता. त्यांचा खूप मोठा ट्रॅक होता. तिथे एक महिला त्यांनी आणून ठेवली होती आणि या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं. पण आमच्या गावाची वाहनं आणि मुलं तिथे पोहोचली तर त्यांना ती गाडी परत घ्यावी लागली, असं म्हणत ग्रामस्थांनी बीड पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती उघड केली. संतोष देशमुख हत्या प्रकरण खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांच्यामुळे उघड झाले. ते संसदेत उभे राहिले आणि त्यांनी भाषण केले. बजरंग सोनावणे आणि मी आठ दिवसांपूर्वी आम्ही अमित शाह यांना भेटून आलो. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय, ते या विषयात जातीने लक्ष घालतील. आम्ही दोघांनी याचे फोटो टाकले नाहीत, काही बोललो नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने गृहमंत्र्यांना विनंती केली. यामध्ये पोलीस किंवा अधिकारी कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करु नका. महाराष्ट्राने तुम्हाला इतकं मोठं मतदान केलंय, न्याय मिळणार नसेल तर काय करायची सत्ता, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. मी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला शब्द देते, मी कोणाला भेटणार नाही, तडजोड करणार नाही. जो कोणी याच्यामागे आहे, त्याला फाशी झाली पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT