Santosh Deshmukh Murder Photo Saam Tv News
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Murder Photo : हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांचा उपवास, पोटात अन्न-पाणी नाही, सहा जणांनी क्रूरपणे मारलं; अंगावर काटा आणणारे फोटो

Beed Santosh Deshmukh Murder Photo Viral : सरपंच संतोष देशमुखांचा कसा क्रूरपणे छळ केलेला आहे. मारहाण आणि हत्या करतानाचे फोटो देखील समोर आलेले आहेत.

Prashant Patil

बीड : संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचे वर्णन आतापर्यंत सांगितलं जात होतं. पण आता त्यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो समोर आले आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाहीत. सीआयडीने जे चार्जशिट दाखल केले आहे, त्यामध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यावेळी हत्या करण्यात येत होती, त्यावेळेस त्यांचे व्हिडीओ काढले गेले. ते व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागले आहेत. याच व्हिडीओचे स्क्रीनशॉर्ट घेऊन फोटोंचा चार्जशीटमध्ये समावेश करण्यात आलाय.

मन विचलित करणारे हे असे फोटो आहेत. किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल, याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो. कोणी दांडक्याने मारत आहे तर कोणी लोखंडी रॉडने मारत आहे कोणी मानेवर पाय ठेवला आहे. त्यांच्यावर अत्याचार केले जात असताना कोणीतरी हसत आहे. व्हिडीओ काढताना वेडेवाकडे चाळे करत आहे. त्यात संतोष देशमुख यांचा पूर्ण चेहरा सुजलेला दिसत आहे. ते जमिनीवर गतप्राण पडले आहेत. त्या अवस्थेतही त्यांना मारलं जात आहे. अशा पद्धतीचे हे फोटो आता समोर आले आहेत.

सरपंच संतोष देशमुखांचा कसा क्रूरपणे छळ केलेला आहे. मारहाण आणि हत्या करतानाचे फोटो देखील समोर आलेले आहेत. ज्या माणसाचा उपवास, त्यांच्या पोटात पाणी नव्हतं आणि त्या एका माणसाला सहाजण क्रूरपणे मारत होते. हे फोटो पाहून खरंच अंगावर शहारे आल्यशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT