Shreya Maskar
उन्हाळ्यात चेहऱ्यावर काळे डाग पडतात. अति सूर्यप्रकाश, मुरूमांचे व्रण, हार्मोनल बदल आणि पिगमेंटेशन यांमुळे त्वचेचा रंग काळवंडतो.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचा स्वच्छ करण्यास आणि डाग हलके करण्यास मदत करते. दुसरीकडे, गुळामध्ये सौम्य नैसर्गिक गूण असतात जे त्वचेला एक्सफोलिएट करतात आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात.
गुळाचा फेस पॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये गुळाचा एक लहान तुकडा बारीक किसून घ्या. यासाठी फ्रेश गूळ वापरा.
यात आता ताज्या लिंबाच्या रसाचे ४-५ थेंब घाला. जास्त लिंबू घालू नका, कारण त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.
गूळ आणि लिंबू चांगले मिसळा. गूळ थोडा घट्ट वाटल्यास हाताने मळून गुळगुळीत करू घ्या. त्याची मऊ पेस्ट बनवा.
चेहऱ्यावर ज्या भागांवर काळे डाग आहेत, तिथे ही पेस्ट लावा. १०-१५ मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा आण चेहरा मॉश्चराइज करा.
उन्हाळ्यात आठवड्यात 2-3 वेळा असे केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि चेहरा मस्त चमकतो.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.