Walmik Karad Sushil Karad News  AI Image
महाराष्ट्र

Beed : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गुन्हा दाखल, महिलेच्या घरात घुसला अन्...

Beed Walmik Karad Son Sushil Karad News : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडसह तिघांविरोधात सोलापुरात गंभीर गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडसह तिघांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल.

  • अनिल मुंडे आणि गोपी गंजे यांचाही आरोपींमध्ये समावेश.

  • एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकूण 14 कलमांनुसार गुन्हा नोंदवल्याची माहिती.

  • महिलेच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याचा आरोप.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्यासह तिघांविरोधात सोलापूरमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवणे, मारहाण करणे आणि विनयभंग केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे सोलापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजे या तिघांविरोधात सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर एकूण 14 कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये पोक्सो कायद्याच्या कलमांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुशील कराड आणि त्याचे साथीदार महिलेच्या घरी जबरदस्ती शिरले यावेळी त्यांनी महिलेला, तिच्या पतीला आणि मुलीला धमकी देत मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. इतकेच नाही तर पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाच्या नावावर असलेला प्लॉट, सोने तसेच दोन वाहने धमकी देऊन स्वतःच्या ताब्यात घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे पीडित कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार 2024 मध्ये घडल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सोलापूर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून पुढील चौकशी केली जाणार आहे. या तक्रारीमुळे वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पुढे या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात भाजपची 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' पदयात्रा

Air cooler Vastu: घरात कूलर कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, 'या' चुका करणं टाळा

Ajay Devgn: गुटखा जाहिरात प्रकरणी अजय देवगणच्या अडचणी वाढल्या? थेट हायकोर्टात धाव, नेमकं कारण काय?

Balushahi Recipe: दिवाळीला फराळात बनवा खुसखुशीत, पाकात मुरलेली आणि स्वादिष्ट बालुशाही, वाचा खास रेसिपी

Diwali Biscuits Recipe : दिवाळी फराळात यंदा काहीतरी हटके! घरीच बनवा बाजारासारखे कुरकुरीत बिस्किट्स, सोपी रेसिपी ट्राय करा

SCROLL FOR NEXT