Breaking News : रेमडेसिवीर घोटाळा, 24 रुग्णालयांना नोटीस जारी!  SaamTvNews
महाराष्ट्र

Breaking News : रेमडेसिवीर घोटाळा, 24 रुग्णालयांना नोटीस जारी!

हा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या थोरात यांना खाजगी गुंडांच्या माध्यमातून, रात्रीच्या दरम्यान शहरात रिव्हॉल्व्हर दाखवून, तक्रार मागे घे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन सीएस सूर्यकांत गित्ते यांनी, रेमडेसिवीर इंजेक्शनसह मेडिसिन व इतर साहित्य खरेदीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. आपल्या मर्जितल्या खाजगी रुग्णालयांच्या नावाने रेमडेसिवीर (remdesivir) दिले असून त्या इंजेक्शनचा काळाबाजार झालेला आहे. हे इंजेक्शन ब्लॅकमध्ये 25 ते 30 हजारांना विकले असल्याचा आरोप, तक्रारदार दीपक थोरात यांनी केला आहे. तर, याच रेमडेसिवीर घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी, पोलीस प्रशासनाकडून बीड (Beed) शहरातील तब्बल 24 खाजगी रुग्णालयांना, नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा :

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार (Black Market) उघड झाला होता. इंजेक्शनच्या (Injection) बॉटलमध्ये सलाईनचं पाणी टाकून विकल्या जात असल्याचं देखील उघडकीस आलं होतं. एका इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना 2- 2 दिवस लाईनमध्ये थांबावं लागलं होतं. मात्र, याचदरम्यान बीड जिल्हा रुग्णालयाचे सीएस आपल्या मर्जितल्या खाजगी रुग्णालयाच्या लेटरच्या माध्यमातून मनाला वाटेल तेवढे रेमडेसिवीर दिले आहेत. असा आरोप थोरात यांनी केलाय.

तर याची तक्रार केल्यानं थोरात यांना खाजगी गुंडांच्या माध्यमातून, रात्रीच्या दरम्यान शहरात रिव्हॉल्व्हर दाखवून, तक्रार मागे घे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांनतर थोरात यांनी रुग्णालयाच्या (Hospital) आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, आता हे प्रकरण तत्कालीन सीएस गित्ते यांना भोवण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाकडून 24 रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली असून रुग्णांना किती रेमडेसिवीर देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोविड (covid) काळात 3 महिन्यात ऍडमिट झालेल्या रुग्णांना कोणते उपचार दिले आहेत? याची देखील माहिती मागवली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून तक्रार करत असतांना योग्य दखल घेऊन, घोटाळेबाजांवर कारवाई केली जात नाही. उलट तक्रार मागे घ्या म्हणत राजकिय दबाव टाकला जात आहे. त्यामुळं या प्रकरणासह जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या 285 कोटींच्या खरेदीची चौकशी करण्यात यावी. यासाठी ईडीकडे (ED) तक्रार करणार असल्याचं, तक्रारदार दीपक थोरात यांनी सांगितलंय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT