Beed: धक्कादायक! प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू; डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याचा नातेवाईकांचा आरोप विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: धक्कादायक! प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू; डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर

विनोद जिरे

बीड: बीडच्या माजलगाव ग्रामीण रुग्णालयात, महिलेचा प्रसूतीदरम्यान सिझरनंतर मृत्यू झाला आहे. योगिता कुलथे अस मयत महिलेचे नाव आहे. प्रसूतीपूर्वी आणि नंतर देखील महिला ठणठणीत होती. परंतु, प्रसूतीनंतर अचानक रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप योगिताचे पती अशोक कुलथे यांनी केला आहे. (Beed Relatives Allegations negligence on the part of doctors)

हे देखील पहा-

या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली असून यामुळे माजलगावमध्ये आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान याप्रकरणी अद्याप तक्रार आली नसून, स्त्रीरोगतज्ज्ञांची एक समिती करून, याची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी सांगितले आहे.

दरम्यान भविष्यात असे प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक डिलिव्हरीकरिता आलेल्या महिलेची तपासणी करून, ज्या हायरिक्स असतील, अशा महिलांची केवळ बीड जिल्हा रुग्णालय, स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय किंवा मेडिकल कॉलेज याठिकाणी डिलिव्हरी करण्यात यावे. अशा सूचना आम्ही सर्व आरोग्य संस्थांना देणार आहोत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

इंडिया आघाडीचा EVM हटावचा नारा, इंडिया आघाडीला हवी बॅलटवर निवडणूक

World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

ठाण्याच्या लेडी डॉनला वाचवतंय कोण? ठाणे बीडपेक्षा वाईट, राऊतांचा हल्लाबोल

ज्ञानेश कुमार हटवा, SIR याद्या गोठवा; मुंबईतील आंदोलनापूर्वी दिपकेंची मागणी

SCROLL FOR NEXT