Beed Purushottampuri boat accident latest update AI
महाराष्ट्र

Beed Boat Accident: अधिकमासात गोदावरीत ३५ भाविकांची बोट उलटली, एका महिलेचा मृत्यू, नदीपात्रात एकच खळबळ

Beed Purushottampuri boat accident latest update : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बोट नदीत उलटली.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Beed Purushottampuri boat accident latest update : बीडच्या माजलगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बोटीला नदीपात्रात भीषण अपघात झाला आहे. ३५ हून अधिक भाविक असलेल्या या बोटीचा समतोल बिघडल्याने ती नदीपात्रात उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेत एका भाविकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नदीपात्रातून प्रवास करत असताना अचानक बोटीचा समतोल सुटला आणि ती उलटली. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त, म्हणजेच ३५ हून अधिक भाविक स्वार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बोट उलटताच नदीपात्रात एकच खळबळ उडाली आणि वाचवण्यासाठी भाविकांनी टाहो फोडला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, काहींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सध्या पवित्र अधिक मासानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गोदावरी नदीपात्रातून भाविकांना बोटीच्या सहाय्याने प्रवास करावा लागतो. पण अधिक पैशांच्या हव्यासापोटी बोट चालकांकडून बोटीमध्ये अनधिकृतपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जाते. त्यामुळे बोटीची दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक 141 वर्ष जूना रामबाग येथील दगडी पूल पाडला

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

Saturday Horoscope : 7 नोव्हेंबरला ग्रहांची मोठी चाल! मेष ते मीन, कोणाचं नशीब चमकणार? वाचा आजचे राशिभविष्य

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT