Beed Protest Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: आंदोलनकर्त्याचा टोकाचा निर्णय, पोलिसांवर गंभीर आरोप; मंत्री पंकजा मुंडेंचंही नाव घेतलं

Beed Protest: बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे गायरानधारकांचे आंदोलन सुरू आहे. या गायरानधारकांना बेदखल करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये ३ गायरान धारकांकडून विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घडली. या गायरान धारकांनी पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचे देखील नाव घेतलं आहे. सध्या बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे गायरानधारकांना बेदखल करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात विष प्राशन केलल्या गायरान धारकांवर उपचार सुरू आहेत. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. यासोबत त्यांनी बीडमधील अनेक नेत्यांची नावं घेत गंभीर आरोप केले आहेत. मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, नमिता मुंदडा लक्ष देत नसल्याचा आरोप या गायरानधारकांनी केला. पोलिसांकडूनच आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ज्या पोलिसांवर गंभीर आरोप झाले त्यानी बोलण्यास नकार दिला.

बीड जिल्ह्यातील जवळगाव येथे गायरान धारकांनी तीन महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. २५ वर्षापासून गायरान कसं उपजीविका भागवत असल्याने या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प करण्यास या गायरान धारकाकडून विरोध करण्यात येत असतानाच आज बर्दापूर येथील पोलिसांचा बंदोबस्त लावून गायरान धारकांना बेदखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तीन गायरान धारकांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावरती सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT