Dr Yogesh Kshirsagar Saam Tv
महाराष्ट्र

Beed Political News: बीडमध्ये अजित पवार गटाची वाढणार ताकद, योगेश क्षीरसागर यांनी हातावर बांधलं घड्याळ

Dr Yogesh Kshirsagar: बीडमध्ये अजित पवार गटाची वाढणार ताकद, योगेश क्षीरसागर यांनी हातावर बांधलं घड्याळ

विनोद जिरे

Dr Yogesh Kshirsagar News: बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर क्षीरसागर कुटुंबातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आज मुंबईमध्ये अजित दादा पवार गटातील घड्याळ हातावर बांधलंय. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाची सूत्र बदलणार आहेत.

बीडमध्ये माजी खासदार स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांच्यापासून बीड जिल्ह्यात क्षीरसागर कुटुंबांचा दबदबा आहे. ओबीसीचे नेते म्हणून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची संपूर्ण राज्यभर ओळख आहे. याच कुटुंबातील जयदत्त क्षीरसागर यांचे लहाने बंधू डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांच्या ताब्यात गेल्या 30 वर्षापासून एक हाती नगरपालिकेत सत्ता आहे.

तर स्वतः भारतभूषण क्षीरसागर हे पाच वेळा नगराध्यक्ष राहिले आहेत. यामुळे बीड मतदार संघात शहरासह क्षीरसागर कुटुंबाचे वर्चस्व आहे. सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीमध्ये असलेल्या क्षीरसागर कुटुंब राष्ट्रवादी मधील हिणकस वागणूक यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करत थेट बंड केले होते.  (Latest News Update)

लोकसभा निवडणुकीनंतर 2018 मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळाले होते. मात्र याचवेळी 2019 च्या निवडणुकीमध्ये काका जयदत्त क्षीरसागर यांचा संदिप क्षिरसागर यांनी पराभव केला. महाविकास आघाडीची सत्ता असतानाही क्षीरसागर कुटुंबांना सत्तेचा वाटा न मिळाल्याने शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामाचे उद्घाटन केले.

त्यामुळं उद्धव ठाकरे गटाने पक्षातून हाकालपट्टी केली. त्यानंतर मात्र कोणता झेंडा घेऊ हाती ही परिस्थिती असतानाच आता. जयदत्त क्षीरसागर यांच्या दुसऱ्या पुतण्यांनी सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या गटाचे घड्याळ हातावर बांधत काकासह चुलत भाऊ आमदार संदीप क्षीरसागर यांना आव्हान दिले आहे.

या प्रवेशासंदर्भात मात्र माझी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका तटस्थ आहे. तसेच डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या बॅनरवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा देखील फोटो आहे. माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या प्रवेशामुळे बीड मतदार संघात राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची ताकद वाढणार आहे. कारण क्षीरसागर कुटुंबाकडे स्थानिक स्वराज्य संस्था सहकारातील अनेक संस्था त्यांच्याकडे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा, होणारा नवरा कोण?

Bhau Beej 2025: भावाला ओवाळण्यासाठी उद्या कोणता मुहूर्त सर्वोत्तम? आत्ताच नोट करून ठेवा वेळ

Maharashtra Live News Update: मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल

Diabetes Symptoms: अचानक वजन वाढतंय, चाललं की दम लागतो? तुम्हाला Diabetes तर नाही ना? लक्षणे जाणून घ्या

Gold Price: दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ३३,८०० रुपयांनी झालं स्वस्त; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT