Sharad Pawar news Saam Tv
महाराष्ट्र

'कुणासोबतही युती करा, पण भाजपसोबत..' शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, राष्ट्रवादीचे २ गट एकत्र येणार?

Sharad Pawar Directs NCP Leaders to Avoid BJP Ties: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शरद पवार यांचे पदाधिकाऱ्यांना सूचना. भाजपसोबत युती न करण्याचे आवाहन.

Bhagyashree Kamble

'आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणासोबतही स्थानिक पातळीवर युती- आघाडी करा, पण भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती करू नका'; असं थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. बीडमधील आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. लवकरच निवडणुका जाहीर होतील. याच पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतंच पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी भाजपसोबत युती - आघाडी न करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

शरद पवार यांच्या या आवाहनानंतर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मस्के यांनी शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांची माहिती दिली. 'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर आपआपल्या परीनं युती करावी. मात्र, भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती करू नये', असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं, असं मस्के यांनी सांगितलं.

दरम्यान, शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सूचनांमध्ये केवळ भाजप पक्षालाच विरोध केला आहे. इतर पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही. त्यामुळे भविष्यात शरद पवार गटाची अजित पवार गटासोबत युती होईल का? अशी चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT