बीड पोलिसांची मोठी कारवाई; काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 250 क्विंटल गहू-तांदूळ पकडला SaamTvNews
महाराष्ट्र

बीड पोलिसांची मोठी कारवाई; काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 250 क्विंटल गहू-तांदूळ पकडला

बीड पोलिसांचा रेशन माफियांना जोरदार दणका !

विनोद जिरे

बीड : बीड पोलिसांनी राशन माफियांना चांगलाच दणका दिलाय. बीड शहरात तब्बल 250 क्विंटल काळ्या बाजारात जाणारे गहू आणि तांदूळ भरलेला ट्रक (Truck) पोलिसांनी पकडला आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून, शहरातील जालना (Jalna) रोड परिसरातील साई हॉटेल समोर MH 23 W 3495 हा ट्रक पकडण्यात आलाय.

हे देखील पहा :

दरम्यान, यामध्ये 250 क्विंटल काळ्या बाजारात जाणारं राशनचं धान्य असल्याचं पोलीस अधिकारी केतन राठोड यांनी सांगितलंय. त्यामुळं हे धान्य कुणाचं आहे ? नेमकं तो राशन (Ration) माफिया कोण ? याची माहिती पोलीस (Police) घेत आहेत.

तर, बीड (Beed) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राशन माफिया सक्रिय असून गोरगरिबांच्या तोंडातील अन्न हे काळ्याबाजारात (Black Market) विक्री करत आहेत. त्यामुळे राशन माफियांवर MPDA ऍक्ट नुसार कारवाई करावी. अशी मागणी दक्षता समिती सदस्य राजू महुवाले यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

मंगळसूत्र कायम नव्यासारखे चमकेल! फक्त फॉलो करा 'ही' एक ट्रिक

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल लोणीकर यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT