Beed Police Action Against 74 People  Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: हवेत गोळीबार करणं भोवलं! बीड पोलिसांकडून ७४ जणांना दणका, गुन्हे दाखल करत शस्त्र परवाने रद्द

Gun License Cancellation Beed Police: बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे या तिघांसह गुन्हा दाखल असलेल्या ७४ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.

Priya More

विनोद जिरे, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापले असताना आता बीड पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बीड पोलिसांनी हवेत गोळीबार करून सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. गोळीबार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत ७४ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. यामध्ये कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचा समावेश आहे. उर्वरित अर्जाची पडताळणी सुरू आहेत. आतापर्यंत बीड पोलिसांनी ३०३ परवाने रद्द केले आहेत.

बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे या तिघांसह गुन्हा दाखल असलेल्या ७४ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली आहे. हवेत गोळीबार करतानाचे याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर जिल्ह्यातील १२८१ शस्त्र परवान्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. कुणालाही शस्त्र परवाना दिल्याचा आरोप करत हे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने पिस्टलसह फोटो, व्हिडीओ असणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २३२ जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. या सर्वांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली. यातील ७१ जणांचा परवाना जिल्हाधिकारी यांनी रद्द केला आहे. तर उर्वरित परवानाधारकांची पडताळणी सुरु आहे. आतापर्यंत ३०३ परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गरज नसताना घेण्यात आलेल्या शस्त्र परवानाधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : क्षुल्लक कारणावरून सुरू झालं भांडण नंतर दे दणादण; त्या हॉटेलबाहेर नेमकं काय घडलं?

Box Office Collection: बॉलिवूड अन् हॉलिवूडमध्ये काटें की टक्कर; 'बागी 4', 'द बंगाल फाइल्स', 'द कॉन्ज्यूरिंग' कोणी मारली बाजी?

Health Care Tips : बोटात अंगठी अडकली? झटपट करा 'हा' उपाय

Nagpur : दुचाकी जाताना अचानक १३० वर्षे जुनी भिंत कोसळली, नागपूरमधील काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Beauty Tips : सुंदर अन् लांबसडक पापण्या हव्यात? करा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT