Beed Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण, हादरवणारा व्हिडीओ समोर

Beed Crime News : बीडमध्ये पुन्हा एकदा हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण झाल्याची घटना परळी येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीडमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला आहे. बीडच्या परळी तालुक्यात एका तरुणाला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. टोळक्याकडून लाठ्या-काठ्यांनी, हत्यारांनी मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी टोळक्यातील तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धार्मिक कार्यक्रमात दोन गटात मारहाण झाली होती. याचाच राग मनात धरुन ही मारहाण झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तरुण विवळत असतानाही टोळक्याकडून त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये पाहायाला मिळते. परळीतील टोकवाडी परिसरात हा प्रकार घडला आहे.

मारहाण झालेला तरुण लिंबोटा येथील असून त्याचे नाव शिवराज दिवटे असल्याची माहिती समोर आली आहे. शिवराज जलालपूर येथून अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरुन परतत होता. तेव्हा काही अज्ञात तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. लाठ्या, काठ्या आणि हत्यारांनी शिवराजला मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

बीडमध्ये एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण झाली आहे. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये काही अज्ञातांकडून तरुणाला मारहाण होत असल्याचे पाहायला मिळते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT