Beed Accident saam tv
महाराष्ट्र

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Beed Accident News : बीडच्या परळीजवळ पांगरी नाथरा मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये जळगाव तांडा येथील माजी सरपंच आणि त्यांची नात अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Yash Shirke

  • परळीजवळील पांगरी नाथरा मार्गावर भीषण अपघातात माजी सरपंच वसंत चव्हाण आणि त्यांची नात श्रुती यांचा जागीच मृत्यू झाला.

  • अपघातात वसंत चव्हाण यांची पत्नी कस्तुराबाई गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत.

  • या दुर्दैवी घटनेने जळगाव तांडा परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed : बीड जिल्ह्यामध्ये एक दु:खद घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील परळीजवळील एका पेट्रोल पंपाशेजारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये माजी सरपंच आणि त्याच्या नातीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामध्ये सरपंच यांची पत्नी गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळी जवळ असलेल्या पांगरी नाथरा मार्गावर पेट्रोल पंपाजवळ आज (१० सप्टेंबर) सायंकाळी भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये जळगाव तांडा येथील माजी सरपंच वसंत ताराचंद चव्हाण (वय - ५५ वर्षे) आणि त्यांची नात श्रुती विजय चव्हाण (वय - ८ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातामध्ये वसंत चव्हाण यांची पत्नी कस्तुराबाई चव्हाण या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे म्हटले जात आहे. परळीतील एका खासगी रुग्णालयाहून गावाकडे परतत असताना चव्हाण कुटुंबाचा अपघात झाला. या घटनेमुळे जळगाव तांडा परिसरात शोककळा पसरली आहे.

श्रुती चव्हाण हीच्यावर परळीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार करुन झाल्यानंतर वसंत चव्हाण, त्यांची पत्नी कस्तुराबाई चव्हाण आणि त्यांची नात श्रुती चव्हाण हे गावीच्या दिशेने निघाले होते. घरी परतताना त्यांचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरु केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT