HUMAN LEG FOUND IN PARLI TPS COLONY OF BEED, POLICE INVESTIGATION UNDERWAY  Saam Tv
महाराष्ट्र

Beed : बीड हादरले! परळीत आढळला माणसाचा तुटलेला पाय; परिसरात प्रचंड खळबळ

Beed Parali News : बीड जिल्ह्यातील परळी शहरातील टीपीएस कॉलनी परिसरात तुटलेल्या अवस्थेतील मानवी पाय आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • परळी शहरातील टीपीएस कॉलनी परिसरात मानवी पाय आढळल्याने खळबळ

  • संशयास्पद वस्तूची पाहणी केल्यानंतर तो मानवी पाय असल्याचे स्पष्ट

  • माहिती मिळताच परळी शहर पोलीस घटनास्थळी दाखल

  • पोलिसांनी मानवी पाय ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे

योगेश काशीद, बीड

काही दिवसांपूर्वी अमृतसर - सीएसएमटी एक्प्रेसच्या डब्याखाली मानवी पाय सापडला होता. यानंतर आता बीडच्या परळीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील टीपीएस कॉलनी परिसरात तुटलेल्या अवस्थेतील मानवी पाय आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नेमका हा प्रकार काय आहे, याबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टीपीएस कॉलनी परिसरातील काही नागरिकांना संशयास्पद अवस्थेत मानवी अवयवासारखी वस्तू दिसून आली. जवळ जाऊन पाहणी केल्यानंतर तो मानवी पाय असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती परिसरात वेगाने पसरल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली.

घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून संबंधित अवयव ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे. हा मानवी पाय नेमका कोणाचा आहे, तो त्या ठिकाणी कसा पोहोचला आणि या घटनेमागे कोणते कारण असू शकते, याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

दरम्यान, अशा प्रकारची घटना शहरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून तपासानंतरच या धक्कादायक घटनेमागील सत्य समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

Banking fraud: OTP न सांगताही बँक खातं रिकामं होऊ शकतं? स्कॅमर्सच्या नव्या युक्तीने होईल नुकसान

भारतात डेंग्यूच्या पहिल्या लशीला मंजुरी, डेंग्यूपासून लवकरच सुटका होणार

सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनात धडकल्या, स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT