Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : वैद्यनाथ मंदिरातील शिवलिंगाचा नवा वाद; मंदिराच्या शिखरावरील भिंत तोडून शिवलिंग दर्शनासाठी खुले

विनोद जिरे

बीड : बीडच्या परळी नगरीतील ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिरातील शिवलिंगाचा नवा वाद समोर आला आहे. मंदिर शिखराच्या पायथ्याला शिवलिंग होते. जुन्या काळापासून या ठिकाणी परळीकर दर्शनाला जायचे. मात्र वैजनाथ देवस्थान ट्रस्टने हे शिवलिंग काढून ही जागा बंद केल्याने माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

वैद्यनाथ मंदिराच्या शिखराच्या पायथ्याशी असलेल्या एका खिडकीसारख्या जागेत बांधकाम करून निर्माण केलेली ही भिंत फोडून टाकण्यात आली. (Beed) आमच्या भावनेचा आणि श्रद्धेचा हा विषय आहे. त्यामुळे शिवलिंग पुन्हा दर्शनासाठी खुले केले, असं दीपक देशमुख यांनी सांगितले. ५ ते ७ लोक सोबत घेत वैद्यनाथ मंदिराच्या कळसापर्यंत जाऊन या ठिकाणी हातोडा चालवत तोडफोड केली. वैद्यनाथ मंदिराच्या शिखराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कुलूप तोडून शिखरावर प्रवेश करत बांधकाम करून निर्माण केलेली ही भिंत फोडून (Parali) टाकली. विशेष म्हणजे या तोडफोडीचे व्हिडिओ देशमुख यांनी सोशल माध्यमावर अपलोड केला आहे. वैद्यनाथ मंदिर शिखरावर ऐतिहासिक दरवाजा आहे. ट्रस्टने हा दरवाजा बंद केल्याने देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी 
दरम्यान वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने याप्रकरणी परळी शहर पोलीसात धाव घेतली असुन अनधिकृत प्रवेश व मंदिर तोडफोड आणि विद्रूपीकरण केले म्हणून दीपक देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा; असा तक्रार अर्ज केला आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नसून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atul Parchure Death : प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड, वयाच्या ५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाण्याची शक्यता

Nagpur News : पोहोयला गेले अन् घात झाला; नागपुरात चार विद्यार्थ्यांचा कालव्यात बुडून मृत्यू, कुटुंबांवर शोककळा

Sharad Pawar Speech: 'पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे', फलटणच्या सभेत शरद पवार यांचं रोखठोक भाषण

Marathi News Live Updates : कल्याणमध्ये तुफान पाऊस, रेल्वे स्टेशन परिसरत पाणी साचलं

SCROLL FOR NEXT