Mahadev Munde Case Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad Beed : वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांची तब्बल १७ तास चौकशी, बीडमध्ये पोलिसांच्या तपासाला वेग

Beed Mahadev Munde News : महादेव मुंडे हत्या प्रकरणात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने परळी येथून पाच संशयितांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये वाल्मीक कराडच्या दोन्ही मुलांची १७ तास चौकशी करण्यात आली.

Alisha Khedekar

  • महादेव मुंडे हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी पाच संशयितांना परळीमधून ताब्यात घेतले.

  • संशयितांपैकी सुशील व श्रीगणेश कराड या दोघांची १७ तास चौकशी करण्यात आली.

  • विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले असून आयपीएस पंकज कुमावत तपास प्रमुख आहेत.

  • तपास अधिक निर्णायक टप्प्याकडे जात असून अटकेची शक्यता अधिक बळावली आहे.

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाने जिल्ह्यात एकच खळबळ उडवली असतानाच तपासाला आता वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी या हत्येचा तपास करण्यासाठी नवीन विशेष SIT स्थापन करण्यात आली आहे. तसेच बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता परळी येथून पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर रात्रीपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात या पाचही व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली.

या चौकशीत एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, मिळालेल्या माहितीनुसार त्या पाच जणांपैकी दोन जण हे आरोपी वाल्मीक कराडची मुलं आहेत. सुशील कराड आणि श्रीगणेश कराड अशी त्यांची नावे असून, याप्रकरणी त्यांची तब्बल १७ तास चौकशी करण्यात आली. पोलिसांना या दोघांवर संशय असून, त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना नोटीस देत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय आणि व्यापारी वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली होती. या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथक (SIT) करत असून, पथकाचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत हे बीडमध्ये दाखल झाले आहेत. तपासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

वाल्मीक कराडच्या दोन्ही मुलांची अटक होण्याची शक्यता आता अधिक बळावली आहे. गुन्हा घडल्यापासून अनेक तर्कवितर्क लावले जात होते, मात्र पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळत नसल्याने वातावरणात संभ्रम होता. आता तपास अधिक गंभीर आणि निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागल्याची शक्यता वर्तवली जात असून, पुढील काही तासांत मोठा खुलासा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत आहे, ज्याचे नेतृत्व आयपीएस पंकज कुमावत करत आहेत.

किती संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे?

बीड स्थानिक गुन्हे शाखेने परळीमधून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

कोणत्या दोन व्यक्तींची विशेष चौकशी करण्यात आली?

सुशील कराड आणि श्रीगणेश कराड, हे दोघे वाल्मीक कराडचे मुलं आहेत आणि त्यांची १७ तास कसून चौकशी करण्यात आली.

त्या पाचही व्यक्तींवर काय कारवाई करण्यात आली?

चौकशीनंतर त्यांना नोटीस देऊन त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

Gk: हाताच्या तळव्यावर केस का नसतात? कारण वाचून चकित व्हाल

Online Shopping Scam : ऑनलाइन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्यासोबत होईल हा स्कॅम

Madha Flood : माढ्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उध्वस्त; सीना नदीच्या महापुरात नुकसान

Paracetamol safety: गरोदर महिलांसाठी पॅरासिटोमोल किती सुरक्षित? WHO आणि AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT