Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : तरुणाला जमावाकडून मारहाण; बीडच्या चकलांबा गावामधील घटना, आरोपींच्या अटकेसाठी बाजारपेठ बंद

Beed News : ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केले जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला आहे

विनोद जिरे

बीड : बीडच्या चकलांबा येथे एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जमावाकडून मारहाण झाल्याने तरुण यात जखमी झाला असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान तरुणाच्या मारहाणीच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. 

बीड जिल्ह्यातील चकलांब या गावातील गोपाल उनवणे या तरुणास मारहाण करण्यात आली आहे. जमावाने पोलीस ठाण्याच्या आवारातच मारहाण केल्याची घटना रात्री घडली आहे. यामुळे तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मारहाण करणारे सापडलेले नाहीत. 

पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या 

पोलिसात गुन्हा दाखल झाला असता तरी आता मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी; या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केले जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला आहे. तसेच यावेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. आता ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे. 

गावातील बाजारपेठ बंद 

गावातील तरुणाला नाहक मारहाण झाल्याच्या कारणावरून गावातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठिय्या आंदोलन करण्यासोबतच या मारहाणीच्या निषेधार्थ चकलांबा गावातील बाजारपेठ देखील बंद करण्यात आली आहे. यामुळे नेहमी वर्दळ असलेल्या बाजारपेठेत आज शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. सध्या गोपाल उनवणे या तरुणावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar Collection : रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट 200 कोटींच्या उंबरठ्यावर, ५व्या दिवशी कमाई किती?

Maharashtra Live News Update: 11 नक्षल्यांचे जिल्ह्यात आत्मसमर्पण

Mayur Singhasan History: ताजमहालपेक्षाही महाग, या सिंहासनाची किंमत वाचून धक्क व्हाल

RBI: कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, EMI लवकरच कमी होणार; RBI ने बँकांना दिले महत्वाचे आदेश

शेतातून उचललं, चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, ओरडताच गुप्तांगात रॉड घुसवला; पीडिता रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध

SCROLL FOR NEXT