Walmik karad 
महाराष्ट्र

Walmik Karad: वाल्मिक कराड-धनंजय मुंडेंकडून हार्वेस्टर मशीन घोटाळा'; मजूरांना मारहाण, कोट्यावधींची फसवणूक

Harvester Machine Scam: वाल्मिक कराडविषयी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता हार्वेस्टरसाठी कराडने शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावलाय. नेमकं प्रकरण काय? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. वाल्मिक कराडने ऊस तोडणीच्या हार्वेस्टरसाठी 36 लाखांचं अनुदान मिळवण्याचं अमिष दाखवून तब्बल 141 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 9 लाख रुपये याप्रमाणे कोट्यावधी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्याने केलाय.

एवढंच नाही तर कराडने शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची भेट घालून दिल्याचा व्हिडीओही शेअर करण्यात आलाय.. पंढरपूरमध्ये फसवणूक झालेल्या 19 हार्वेस्टर मालकांचे जबाब नोंदवण्यात आल्याने कराडचा पाय आणखी खोलात गेलाय. 141 हार्वेस्टरच्या अनुदानासाठी कराडने 5 हजार 141 लोकांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचा आरोप करत धसांनी कराडसह मुंडेंवर निशाणा साधलाय.

कराडचा नवा कारनामा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड वेगवेगळ्या प्रकरणात अडचणीत आलाय.. ही प्रकरणं नेमकी कोणते आहेत? पाहूयात.

कराडचे कारनामे

सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित आवादा कंपनीकडून 2 कोटीच्या खंडणी प्रकरणी सीआयडी कोठडी

सुरेश धसांनी संपत्तीबाबत खुलासे केल्यानंतर कराड ईडीच्या निशाण्यावर

हार्वेस्टर अनुदानाचं अमिष दाखवून कोट्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप

वाईन शॉप लायसन्सबाबत दमानियांचे कराडवर गंभीर आरोप

वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द

एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर संशय व्यक्त केला जातोय. त्यातच आता थेट धनंजय मुंडेंच्या जवळीकीचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचं प्रकरण समोर आल्याने आता कराडवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हार्वेस्टर घोटाळ्याची चौकशी करणार का? आणि कराड दोषी असेल तर त्याला शिक्षा होणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

SCROLL FOR NEXT