Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed: गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन; रस्त्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक

गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन; रस्त्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक

विनोद जिरे

बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यातील मांजरथ गावच्या रस्त्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडे एक ना अनेक वेळा मागणी करत निवेदन दिली. मात्र याची कोणतीच दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी (Godavari River) गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. (Beed News Villagers Protest Damage Road)

माजलगाव (Beed News) शहरापासून 11 किलोमीटरवर असणाऱ्या गोदावरी नदी तिरावर वसलेल्या मंजरथची लोकसंख्या जवळपास 4 हजार आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक वास्तुमुळे गावाला तीर्थ क्षेत्र विकासाचा दर्जा प्राप्त आहे. दक्षिण प्रयाग लक्ष्मी विक्रम मंदिरासह गोदातीरावर लहान मोठी जवळपास 40 मंदिरे आहेत. गोदावरी, सिंदफना व गुप्त सरस्वती या नद्यांचा येथे त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे दशक्रिय विधिसह इतर धार्मिक विधीसाठी राज्यभरातुन दररोज नागरिक येथे येतात.

तोपर्यंत जलसमाधी आंदोलन

प्रशासनाच्या उदासिनतेमुळे मंजरथ- माजलगाव रस्त्याची अवस्था बिकट झालीय. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन धारकांना व शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तात्काळ करा. ही मागणी घेऊन ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान जोपर्यंत रस्त्याविषयी ठोस निर्णय होत नाही; तोपर्यंत जलसमाधी आंदोलनातून माघार नाही. असा पवित्रा आंदोलक ग्रामस्थांनी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT