Beed News Majalgaon Dam Saam tv
महाराष्ट्र

Beed: माजलगाव धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडले; 1208 क्यूसेस पाण्याचा विसर्ग

माजलगाव धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडले; 1208 क्यूसेस पाण्याचा विसर्ग

विनोद जिरे

बीड : माजलगाव धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडले. यामुळे धरणाच्‍या ती दरवाज्यातून 1 हजार 208 क्यूसेस वेगाने सिंदफना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीला पुर असल्‍याने (Majalgaon) माजलगाव, पाथरी, मानवत, गंगाखेड, सोनपेठ, परळी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Beed News Heavy Rain)

बीडच्या (Beed) माजलगाव येथील धरण 100 टक्के भरले असून यंदाच्या पावसाळ्यात (Rain) पहिल्यांदाचं आज धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता या धरणाचा एक दरवाजा उघडला होता. तर आता पुन्हा एकदा 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान सद्यस्थितीत धरणाच्या 3 दरवाज्यांमधून 1208 क्युसेस प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीपात्रात सुरू आहे.

आणखी गेट उघडून विसर्ग

सिंदफणा नदीला पुर आल्‍याने माजलगाव, पाथरी, मानवत, गंगाखेड, सोनपेठ, परळी परिसरातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली; तर आणखी गेट उघडून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे. अशी माहिती पाठबंधारे विभागाच्या बी.आर.शेख यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

SCROLL FOR NEXT