Nagpur Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Children Drowned Lake : पालखी सोहळ्यासाठी गावी गेले, ते परतलेच नाही; बीडमध्ये 2 चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू

Beed News: बीडमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी तीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

विनोद जिरे

Beed News: पालखी सोहळ्यासाठी पाहुणे आलेल्या दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. रोहा तालुक्यातील निडी येथे मंगळवारी ही घटना घडली. या घटनेत आरुष भोय (वय ६ वर्षे) आणि निरव वाघमारे (वय ६ वर्षे) अशी मृत मुलांची नावं आहेत.

मृत्यू झालेली दोन्ही मुलं रोहा तालुक्यातील निडी गावात पालखी सोहळ्यासाठी पाहुणे आले होते. मात्र त्यांचा इथेच तलावात बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेला आरुष भोय (वय ६ वर्षे) हा रायगडच्या पेण तालुक्यातील झोतिरपाडा येथील रहिवासी आहे, तर निरव वाघमारे (वय ६ वर्षे) हा मुंबईतील घाटकोपर येथील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही दोन्ही मुलं गावातील तलावात पोहायला गेली होती. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते तलावात बुडाले. ही घटना घडली देव्हा तलावाजवळ कोणी नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

बीडमध्येच दुसऱ्या घटनेत 10 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू

बीडच्या बेलेश्वर संस्थान परिसरातील तलावात 10 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. शिवराय अशोक वायभट रा. पिंपरनई असं मृत मुलाचं नाव आहे. बेलेश्वर मंदिरात 3 दिवसीय सप्ताह सुरू आहे. या सप्ताहसाठी मंदिरात आलेला शिवराय दिसत नसल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली. (Beed News)

यादरम्यान याच मंदिरालगत असणाऱ्या तलावाच्या काठावर त्याचे कपडे आणि चप्पल आढळली. यामुळे गावकाऱ्यांसह नेकनूर पोलिसांनी पाण्यात उतरून पाहिलं असता त्याचा मृतदेह आढळून आला. शिवराय नेमकं पोहण्यासाठी तलावात गेला होता की त्याचा घातपात झाला? याचा तपास नेकनूर पोलीस करत आहेत. (Latest Marsthi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT