Sanjay Raut : जालियनवाला बाग हत्याकांडप्रमाणे बारसू हत्याकांड होईल ...; संजय राऊतांनी व्यक्त केली भीती

Ratnagiri Barsu Refinery : या सर्व परिस्थीतीवर खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautPolitical News
Published On

Ratnagiri Barsu Refinery : रिफायनरी प्रकल्पाला सलग दोन दिवसांपासून नागरिक विरोध करत आहेत. बारसू येथे कालपासून नागरिकांनी ठिय्या मांडला आहे. यात महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला आहे. मात्र आता पोलिस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची होउन हे प्रकरण चिघळल्याचे दिसत आहे. या सर्व परिस्थीतीवर खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधत बारसूमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड होण्याची भीती राऊतांनी व्यक्त केली आहे. (Ratnagiri Barsu Refinery)

माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, लोकांचा विरोध आहे स्थानिकांचा विरोध आहे. साधारण कालपासून पाच ते सहा हजार लोक बारसूच्या माळराणावर जमले आहेत. आम्ही मरू गोळ्या खाऊ पण इथून हटणार नाही, अशं येथील जमावाचे म्हणणे आहे.एकिकडे अशी परिस्थिती असताना या राज्याचे उद्योगमंत्री हे पोलिसांना हाताशी धरून बारसूच्या आंदोलकांवर ज्याप्रकारे खारघरला सदोष मनुष्यवध केला त्या प्रकारे त्यांना धमक्या दिल्या जातात, अशी टीका राऊतांनी केली आहे.

Sanjay Raut
Crime News In Mumbai : आयुष्य उद्ध्वस्त झालं...; झटपट पैसे कमवण्यासाठी तरुणाने केलं हे भयानक कृत्य

तुमच्यावर गोळ्या चालवू म्हणून पाच ते सहा हजार कुटुंब माळराणावर आहेत. विरोध करण्यासाठी अनेक कुटुंब परागंधा झालेली आहेत. अनेकांना पोलीस स्टेशनला बोलवून 24-24 तास बसवून धमक्या दिल्या जातायत. हजारो बारसू ग्रामस्थांना तडीपाडीच्या नोटीस बजावल्या आहेत. इतकेच नव्हे तर जे बारसूचे रहिवाशी राजापुरातील रहिवाशी मुंबईत राहतात आणि त्यांचा विरोध आहे त्या कुटुंबीयांचा मुंबईतल्या घरावर सुद्धा पोलीस लाठ्या घेत घरात घुसून धमक्या देत आहेत, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

पुढे त्यांनी म्हटलं की, मुंबईतल्या रहिवाशांना सुद्धा अटक केली आहे. विकृत मनोवृत्तीचे सरकार, दहशतवादी सरकार असा उल्लेख यावेळी राऊतांनी केला आहे. असं वाटतं जर हे मागे हटले नाहीत तर त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातील आणि जालियनवाला बाग हत्याकांड प्रमाणे बारसूचा हत्याकांड होईल, असं मला वाटत असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut
Child Accident Viral Video : भयंकर! ८ महिन्याच्या चिमुकल्याचं खिडकीत अडकलं मुंडकं...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

शशिकांत वारिसे यांचा मृत्यू नसून ती हत्या

म्हणून लवकरच या प्रकरणात माननीय उद्धव ठाकरे लक्ष घालणार आहेत. कदाचित आम्हाला तिकडे जावं लागेल. आम्ही जनतेबरोबर आहोत जनतेने विरोध केलेला आहे. जनता छातीवर गोळ्या घ्यायला तयार आहे. जनता तुरुंगात जायला तयार आहे. अशा वेळेस शिवसेना ही स्वस्त बसणार नाही. शशिकांत वारिसे यांचा मृत्यू नसून ती हत्या आहे रिफायनरी संदर्भात झालेली हत्या आहे. असाही खळबळजनक दावा राऊतांनी केला.

माझंआव्हान आहे मुख्यमंत्र्यांना, माननीय एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतःला गोरगरिबांचे कैवारी समजतात ते सध्या तीन दिवस सुट्टीवर गेले आहेत. त्यांच्या घराजवळच हेलिकॉप्टर आहे तेच हेलिकॉप्टर घेऊन बारसूला जावं आणि जे आंदोलनाला बसले आहेत ७२ तासापासून त्यांची अवस्था काय आहे, पोलिसांनी कशा बंदूका रोखल्या, धमक्या दिल्या हे समजून घ्यावे,असा टोला राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लगावला, तसेच देवेंद्र फडणवीस त्यांच्या हृदयात थोडी जरी मानवता येत असेल तर त्यांनीही जावं पहावं काय अवस्था आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com