Beed Vida Village Unique Holi Celebration: Saamtv
महाराष्ट्र

Beed News: डी.जे चा दणदणाट अन् लाडक्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक; १० दशकांची अनोखी परंपरा

Beed Vida Village Unique Holi Celebration: बीड जिल्ह्यातील विडा गावात धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढली जाते. गावामध्ये ही परंपरा गेल्या १० दशकांपासून आहे.

विनोद जिरे

Beed News:

जावयाची घोड्यावरील मिरवणूक तर सर्वांनी पाहिली असेल, मात्र बीड जिल्ह्यातील विडा गावात धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढली जाते. गावामध्ये ही परंपरा गेल्या १० दशकांपासून आहे. लाडक्या जावयाला गाढवावर बसून मिरवताना अख्खे गाव डीजेच्या तालावर नाचते.

सासरवाडीत जावयाचा मोठा मान असतो. लाडाचा जावई जर सासुरवाडीला आला तर त्याचा पाहुणचार करण्यात कसलीच कसर ठेवली जात नाही. मात्र बीडमधील एक याला अपवाद आहे. बीडमधील विडा गावात जावयाची गाढवावर बसवूनन वाजत- गाजत मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. या परंपरेत आतापर्यंत तब्बल 90 जावयांना गाढवावरती बसून वाजत गाजत गावात मिरवले गेले आहे.

त्यामुळे धुळवड म्हटलं की या गावचे जावई भूमिगत होतात. मात्र शेर असलेल्या जावयास मेहुणे मंडळी सव्वाशेर भेटते आणि पातळातून शोधून काढते. या शोध मोहिमेत गावातील महिला देखील सहभागी होतात आणि मग सुरू होते जावयाची गदर्भ स्वारी. यावर्षी गाढवावर स्वार होण्याचा मान शिंदी गावचे संतोष नवनाथ जाधव यांना मिळाला. एकनाथ पवार यांचे ते लाडके जावई आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, एकीकडे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यामुळे गाव खेड्यामध्ये ओबीसी - मराठा संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे बीडच्या विडा गावामध्ये हा अनोखा एकतेचा संदेश आजही दिला जातोय. संपूर्ण गाव लहानांपासून वृद्धांपर्यंत एकत्र येत जावयाची अनोखी मिरवणूक काढतात. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik To Ratnagiri Travel: नाशिकवरुन रत्नागिरीला जायचंय? आरामदायक प्रवास कसा कराल? वाचा योग्य मार्ग आणि टिप्स

Genelia : 'सुख कळले...'; 'वेड' चित्रपटाबद्दल जिनिलियानं केला मोठा खुलासा

Dnyanada Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं वय किती?

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

SCROLL FOR NEXT