Beed News:  Saamtv
महाराष्ट्र

Beed News: 'कार्यालयावरील हल्ला राजकीय हेतूने..' तालुकाध्यक्ष कुंडलिक खांडे यांचा दावा; कारवाई करण्याची मागणी

maratha Reservation Protest Beed: दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये जाळपोळ झाली होती.

विनोद जिरे

Beed News:

माझ्या कार्यालयावर झालेला हल्ला राजकीय हेतूने प्रेरित असून मराठा समाज असा प्रकार करु शकत नाही. असा मोठा दावा शिवसेना शिंदे गट तालुकाध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी केला आहे. तसेच हा सर्व प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितला असून सखोल चौकशी करावी, विनाकारण कोणालाही अटक करू नये, अशी मागणी मी पोलीस अधीक्षकांकडे केल्याचेही खांडे यांनी सांगितले आहे.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये जाळपोळ झाली होती. यामध्ये शिंदे गटाचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाचीही तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणी आज कुंडलिंक खांडे यांनी पोलीस अधिक्षकांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले कुंडलिक खांडे?

"30 तारखेची घटना झाली त्यावेळी मी बीडमध्ये (Beed) नव्हतो. माझ्या कार्यालयावर दोन वेळा दगडफेक झाली, त्यानंतर पुन्हा एकदा जमाव कार्यालयापर्यंत आला आणि जाळपोळ केली. झालेला प्रकार निंदनीय आहे, तो राजकीय हेतूने प्रेरित असावा, मी सर्वसामान्य कुटुंबातून आहे. माझी जी प्रगती झाली,जो राजकीय आलेख वाढला त्यामुळेच हा हल्ला झाला असावा.. असा आरोप खांडे यांनी केला आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच "मराठा समाजाने यापूर्वी आंदोलन केले आहेत. परंतु असा प्रकार कधी झाला नव्हता. या हल्ल्यामागे राजकीय हेतूच असावा, मराठा समाज असे करू शकत नाही. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी मी पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याचेही कुंडलिक खांडे यावेळी म्हणाले.

"माझ्याकडे असलेले पुरावे देखील मी त्यांना दिले असून विनाकारण कोणालाही अटक करू नका, ज्याच्या विरोधात पुरावे असतील त्यालाच ताब्यात घ्या. कोणीतरी आरोप करतो म्हणून एखाद्याला ताब्यात घेऊ नका," अशी मागणी ही मी पोलीस अधिक्षकांकडे केली असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

SCROLL FOR NEXT