Beed Political News  Saamtv
महाराष्ट्र

Beed News: सुषमा अंधारेंविरोधात बंड, बीडमध्ये ४ तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; ठाकरे गटात खळबळ

Beed News: जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांच्या निवडीमध्ये ४० लाख रुपये पदाचा रेट ठरवून पदे वाटप केली आहेत, असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंवर करण्यात आला.

विनोद जिरे

Beed Political News:

बीड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटातील चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करत या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखाच्या निवडीमध्ये 40 लाख रुपये पदाचा रेट ठरवून पदे वाटप केली आहेत. सुषमा अंधारे या पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष संपवण्यासाठी काम करत आहेत, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

बीडच्या (Beed) परळीमध्ये ठाकरे गटातील चार तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सामूहिक राजीनामे दिले आहेत. बीड जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करत नवीन तीन जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली, या निवडीवर नाराजी व्यक्त केल्याने सुषमा अंधारेंच्या (Sushma Andhare) विरोधातील गटबाजी उफाळून आली आहे.

सुषमा अंधारे यांनी तीन नव्याने जिल्हाप्रमुखांची निवड केली. यानंतर आज परळीतील तालुकाप्रमुखांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले. तसेच व्यंकटेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख अभय कुमार ठक्कर, अंबाजोगाई तालुका प्रमुख राजाभाऊ लोमटे या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिलेत.

जिल्ह्यात ठाकरे सेना नाही तर अंधारे सेना करण्याचे काम सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप या शिवसैनिकांनी केला. तसेच "सुषमा अंधारे या मराठा द्वेशी आहेत. अनिल दादा जगताप यांनी मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याने त्यांच्यावर कारवाई केली," असा आरोपही तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला. (Latest Marathi News)

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT