Parali News Saam tv
महाराष्ट्र

Parali News : पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी परळी बंद; शहरात काढण्यात आली रॅली

Beed News : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. याचा तीव्र निषेध केला जात आहे.

विनोद जिरे

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने आज बीडच्या परळी येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला आज परळीत प्रतिसाद मिळत असून व्यापाऱ्यांसह दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग नोंदवत आपली दुकाने बंद ठेवली आहेत.  

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. याचा तीव्र निषेध केला जात आहे. याचा निषेध म्हणून सकल ओबीसी समाज तथा मुंडे समर्थकांकडून हा बंद पुकारण्यात आला असून याबाबतचे निवेदन काल परळी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले होते. आजच्या पुकारण्यात आलेल्या बंदला परळी (Parali) शहरातील व्यापाऱ्यांसह दुकानदारांकडून मोठा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळाले आहे. 

आज परळी शहरातून ओबीसी समाज तथा मुंडे समर्थकांकडून शहरातून रॅली काढण्यात आली. दरम्यान काल बीडमधील शिरूर कासार येथे ही याच कारणास्तव बंद पुकारण्यात आला होता. तर आज परळी शहर बंद असून उद्या वडवणी शहर बंदची देखील हाक ओबीसी समाजाकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT