Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: 'केंद्र व राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी..' जरांगे पाटलांचे प्रभू श्रीरामाला साकडे

Maratha Aarkshan: "मराठा समाजाच्या अनेक पिढ्या आरक्षणाअभावी बरबाद झाल्या आहेत. आता भावी पिढीसाठी प्रत्येकाने घराबाहेर पडायचे आहे," असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

विनोद जिरे

Manoj jarange Patil News:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे सहकारी ऋषीकेश बेंद्रे यांच्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) सरकारवर निशाणा साधला. प्रभू श्रीरामाने अन्याया विरोधात लढा उभारला होता. आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालाय. आता तो दूर करण्याची सद्बुद्धी प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य सरकारला द्यावी व मराठा आरक्षण जाहीर करावे.. असे ते म्हणाले.

काय म्हणालेत जरांगे पाटील?

"मराठा समाजाच्या अनेक पिढ्या आरक्षणाअभावी बरबाद झाल्या आहेत. आता भावी पिढीसाठी प्रत्येकाने घराबाहेर पडायचे आहे. असे आवाहन करत आरक्षणाची ही लढाई निर्णायक असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) म्हणाले.

यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या मराठा आरक्षणाला १ वर्ष लागू शकते या दाव्यावरुनही प्रतिक्रिया दिली. "चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य हे सुप्रीम कोर्टातील आरक्षणाबाबत असेल, आम्हाला आधीपासूनच आरक्षण आहे. आता पुरावे देखील सापडले आहेत, त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्यावे," अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

भुजबळांवर निशाणा...

बीडमध्ये (Beed) होत असलेल्या ओबीसी बांधवांच्या सभेवरुन जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर पुन्हा निशाणा साधला. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या बाबत काय बोलावे ? ते कामातून गेलेले आहेत. अशी टीका जरांगे पाटील यांनी केली. तसेच लोकशाहीत ज्याला त्याला सभा घ्यायचा अधिकार आहे.. असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT