Majalgaon Dam Saam tv
महाराष्ट्र

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

Beed News : बीड जिल्ह्यात पावसाचा पाचव्या दिवशीही धुमाकूळ शेतकऱ्यांच्या कपाशी पिकासह सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात नुकसान शेतामध्ये तलावाचे स्वरूप आले आहे. धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: बीड जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे माजलगाव धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पाण्याची आवक होत असल्याने आज सकाळी ११ वाजेपर्यंत धरण ५६ टक्क्यांवर पोहोचले असून, सध्या १० हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे.

बीड शहरासह माजलगाव शहराची तहान भागवणारे जिल्ह्यातील सर्वात मोठे माजलगाव धरण आहे. धरण यंदा मृत साठ्याच्या आत गेले होते. मात्र मे महिन्यात झालेल्या पावसाने पाणी पातळीत थोडी वाढ झाली होती. तर जून व जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे ९ ऑगस्ट रोजी धरण फक्त २५ टक्के भरले होते. मात्र मागील पाच दिवसांच्या जोरदार पावसामुळे पाणीपातळीत ४० टक्क्यांची भर पडल्याने सद्यस्थितीला धरण ५६ टक्के भरले आहे. 

पाण्याचा प्रश्न मिटला 

धरण अभियंता गणेश झापगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीतून पाण्याची आवक कायम राहिल्यास रविवारपर्यंत धरणाची पातळी ८० टक्क्यांवर जाईल असा अंदाज आहे. सध्या तरी माजलगाव शहर व तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली
माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून गंगामसला येथील गावकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कुठल्याही क्षणी गावांमध्ये पाणी घुसू शकते; अशी स्थिती बीडच्या माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे झाली असून गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पुराचे पाणी गावामध्ये शिरले असून गावांमधील मोरेश्वर मंदिर पाहण्यासाठी गेले आहे. याचा फटका गंगामसला येथील शेती पिकांना बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Rain Video: ठाण्यात मुसळधार पाऊस! पाण्यासोबत घरात शिरले साप | VIDEO

Maharashtra Rain Live News: कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली

कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होतो?

Baramati Crime News : भेटण्यासाठी बोलावत केले भयानक कृत्य; तरुणाला नग्न करून बेदम मारहाण

शहरात फिरवलं अन् हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध; शिवसेनेच्या माजी आमदारावर महिलेचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT