Pankaja Munde Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde News: क्षीरसागर गेले कार्यकर्ते मात्र थांबले; पंकजा मुंडेंचे घेतले आशिर्वाद, फोटोही काढला

विनोद जिरे

बीड : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भाजपची जवळीक होत असल्याने आणि (BJP) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या काहीशा नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. परंतु, क्षीरसागर यांचे कार्यकर्ते मात्र पंकजा मुंडे यांच्या जवळ जात असल्याचे पाहायला (Beed News) मिळत आहे. पंकजा मुंडे यांचे आशिर्वाद घेवून फोटो देखील काढले. (Maharashtra News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यात आले असता पंकजा मुंडे या दौऱ्यात नव्हत्या. मात्र या दरम्यान माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे फडणवीस यांच्यासोबत पाहायला मिळाले. त्याचबरोबर त्यांची भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत देखील जवळीक वाढलेली आहे. यामुळे पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांचे नगरसेवक असणारे कार्यकर्ते मात्र पंकजा मुंडे यांच्या जवळ जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

कार्यकर्त्यांसाठी त्‍या थांबल्‍या

भाजप नेत्या पंकजा मुंडे बीड शहरातील मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त लावलेल्या पेंडॉलमध्ये आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना चहासाठी आग्रह केला. यामुळे पंकजा मुंडे या त्याठिकाणी बसल्या. यादरम्यान माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे देखील आले असता काही वेळ क्षीरसागरांसोबत बोलून त्यांनी चहा येण्यापूर्वीचं काढता पाय घेतला.

कार्यकर्ते मात्र थांबले

मात्र या दरम्यान डॉ. भारतभूषण क्षिरसागरांसोबत आलेल्या काही माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांच्या सोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी "ताई आम्हाला तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे", असं म्हणत फोटो काढला. एवढेच नाही तर यावेळी पंकजा मुंडेंच्या पाय पडून त्यांनी मुंडेंचे आशीर्वाद देखील यावेळी घेतले.

चर्चांना उधाण

एकीकडे जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची जवळीक साधली असतांना दुसरीकडे मात्र क्षीरसागर यांचे ग्राउंडवरचे कार्यकर्ते, पंकजा मुंडेंच्या जवळ जात असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे जयदत्त क्षीरसागर हे भाजपचा गड जवळ करत असतांना, बीडच्या बालेकिल्ल्यात क्षीरसागरांच्या गडाचा पाया खचतो की काय? अशी जोरदार चर्चा यानिमित्याने होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोण कोणाचा गड सर करणार? अन्‌ कोणाचा गड ढासळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अहेरी विधानसभेत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Sara Ali Khan Networth: 'पतौडी' घराण्यात जन्मली सारा; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT