Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: ३ लाखाच्या खंडणीसाठी कॉन्ट्रॅक्टरच्या मुलीचे अपहरण

३ लाखाच्या खंडणीसाठी कॉन्ट्रॅक्टरच्या मुलीचे अपहरण

विनोद जिरे

बीड : खंडणीसाठी कॉन्ट्रॅक्टरच्या मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना बीडच्या आष्टी शहरात उघडकीस आली. त्यामुळे (Beed News) जिल्ह्यात वाढत असणाऱ्या गुन्हेगारीमुळे कायदा सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न नागरीकांना पडत आहे. आष्टी (Ashti) शहरातील गुत्तेदाराकडून खंडणी वसूल करण्याच्या हेतूने खंडणी बहाद्दरांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून इंदापूर-भिगवन परिसरात डांबून ठेवले होते. (Maharashtra News)

मुलगी सुरक्षीत पाहिजे असेल तर ३ लाख घेवून ये.. असे फोन येत होते. यानुसार मुलीच्‍या वडीलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आष्टी पोलीस आणि सायबर विभाग यांनी तांत्रिक तपासाला वेग देत संबंधित आरोपी आणि पिडित मुलगी ही इंदापूर- भिगवन परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली. यानंतर आष्टी पोलिसांनी या भागात सापळा रचला.

गोपनियता पाळत मुलीची सुटका

खंडणी बहाद्दरांनी पिडित मुलीस डांबून ठेवल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तेव्हा पोलिसांनी अत्यंत गोपनियता आणि सावधपणे डांबून ठेवलेल्या ठिकाणावरून पिडित मुलीची सुटका करत तिला स्वत:च्या ताब्यात घेतले. तर याच दरम्यान संबंधित अपहरण कर्त्याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT