Beed Rain Saam tv
महाराष्ट्र

Beed Rain : बीडसह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची संततधार; जनजीवन विस्कळीत

Beed News : दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यात यंदा वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. १ जूनपासून बीडसह जिल्ह्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला आहे

विनोद जिरे

बीड : बीडसह जिल्ह्यातील अनेक भागात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे लागवड केलेल्या कापसासह खरीपातील पिकांना वाढीसाठी दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे शहरातील सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांचे हाल सुरू आहेत.

दुष्काळाचा सामना करणाऱ्या (Beed) बीड जिल्ह्यात यंदा वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. १ जूनपासून बीडसह जिल्ह्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्या जोरावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. दरम्यान आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. संततधार (Rain) पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड शहरातील सखल भागात तसेच रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले आहे. 

सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. मात्र अद्यापही प्रकल्पीय पाणीसाठा जैसे थे आहे..त्यामुळं मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत बीडकर आहेत. तर बीड नगरपालिकेने नाल्यांची सफाई न केल्याने पावसाच्या पाण्यामुळे नाल्यातील कचरा रस्त्यावर पसरल्याचे चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. तर पावसाचा जोर वाढल्यास नाल्यांचे पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran-US War: अखेर इराण-अमेरिका युद्ध थांबलं? युद्धविरामाची इनसाईड स्टोरी

Mumbai Crime: 122 कोटींच्या बँक घोटाळ्यात ED ची मोठी कारवाई; 16.95 कोटींची मालमत्ता जप्त

इस्रायलकडून बेरूतवर भीषण बॉम्ब हल्ला,११२ जण ठार आणि ८०० हून अधिक जण जखमी

भाजप आमदाराची बिल्डरला जीवे मारण्याची धमकी; खुद्द सुपारी घेणाऱ्या गुंडाचं पोलिसांना पत्र

धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे; व्हिडिओ शूट होत असतानाही थांबला नाही, विकृत कृत्य कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT