Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : आरक्षणाच्या उपोषणातून घरी गेले; पती- पत्नीचे घरी जाऊन धक्कादायक कृत्य

Beed News : आरक्षणाच्या उपोषणातून घरी गेले; पती- पत्नीचे घरी जाऊन धक्कादायक कृत्य

विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार (Beed) बीड जिल्ह्यातील जातेगाव येथे सुरु असलेल्या उपोषणात सहभागी पती-पत्नी अचानक घरी गेले. यानंतर त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची (Maratha Aarkshan) घटना गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे उघडकीस आली. (Maharashtra News)

बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे सदर घटना उघडकीस आली आहे. राजु बंडू चव्हाण (वय ३१) आणि सोनाली राजु चव्हाण (वय २८) असे मयत दाम्पत्यांचे नाव आहे. आज सकाळपासून (Maratha Reservation) जातेगाव येथे मराठा आरक्षणा संदर्भात उपोषण सुरु आहे. या आंदोलनात राजु चव्हाण हे सहभागी झाले होते. अचानक उपोषणातून उठले आणि उपोषण स्थळापासून काही अंतरावर असलेल्या घरी जावून बायकोसह गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

पती- पत्नीने आत्महत्येची घटना आज उघडकीस आल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी तलवाडा पोलीस अधिक तपास करत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; ५२७ कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाच्या तारखा

Maharashtra Live News Update: अलिबाग समुद्रात दोन तरुण बुडले, शोध सुरू

Maharashtra Politics: मोर्चात ठाकरेंची बडवा-बडवीची भाषा, ठाकरेंची एकी, महायुतीला धडकी?

Maharashra News: महाराष्ट्रात येणार केंद्राचं पथक; पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?

SCROLL FOR NEXT