Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed: सिंदफना नदीने बदलले पात्र; ७ एकर शेती पिकांसह गेली वाहून, शेतकरी महिलेच्या डोळ्यात अश्रू

सिंदफना नदीने बदलले पात्र; ७ एकर शेती पिकांसह गेली वाहून, शेतकरी महिलेच्या डोळ्यात अश्रू

विनोद जिरे

बीड : एकीकडे दिवाळीचा उत्सव सुरू असतांना दुसरीकडे मात्र अतिवृष्टी पीडित शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. बीडच्या (Beed) कुर्ला, औरंगपूर व गावच्या शिवारातून वाहणाऱ्या सिंदफना नदीने पात्र बदलल्याने उभ्या पिकांसह जवळपास 7 एकरवरील जमिनी वाहून गेल्या आहेत. (Tajya Batmya)

सिंदफना नदीवरील औरंगपूर शिवारातील केटीवेअर बंधाऱ्यालगत नदीने पात्र बदलले आहे. यामुळे औरंगपुरच्या कल्याण उनवणे, जिजाबाई श्रीरंग उनवणे, संजय घोडके यांच्यासह 10 ते 12 शेतकऱ्यांची (Farmer) जमीन वाहून गेली आहे. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतली नाही. गतवर्षी कल्याण उनवणे यांची विहीर वाहून गेली होती. तर दोन दिवसांपूर्वी त्यांचा बोरही वाहून गेला. यंदा झालेली अतिवृष्टी (Heavy Rain) त्यांच्या जवळपास 30 फूट जमीनीला देखील नदीचे रूप आले आहे. त्यामुळे आता कुठे पेरावे? जगावं कसं? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे.

महिला शेतकरीचे अश्रू अनावर

लोकांची व्याज व्यवहारी करून पाच एकर जमीन घेतली. मात्र त्यापैकी जवळपास 3 एकर जमीन वाहून गेली. या जमिनीला नदीचे स्वरूप आले. यामुळे आमच्या कुटुंबांने जगावं कसं ? कुठे पेरावे? असा प्रश्न आहे. अशी आपली व्यथा सांगताना महिला शेतकरी जिजाबाई उनवणे यांना अश्रू अनावर झाले आणि त्या ढसाढसा रडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यातील पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Homemade Coconut Lassi Recipe: उन्हाळ्यात थंडगार कोकोनट लस्सी कशी बनवायची? सोपी आहे रेसिपी

प्रसिद्ध खेळाडू भाजपमध्ये प्रवेश करणार? पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

Pune News: पुण्यातील कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, पाणी पिताना विजेचा धक्का लागला अन् चैतन्य खाली पडला

Dhurandhar 2 : 'धुरंधर २' विरोधात FIR दाखल; VIDEO शेअर करत आर. माधवननं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला-"मैंने सिगरेट..."

SCROLL FOR NEXT