Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

Jalgaon: रात्री आरामासाठी थांबलेल्‍या ट्रक क्‍लीनर तरुणाची आत्महत्या

रात्री आरामासाठी थांबलेल्‍या ट्रक क्‍लीनर तरुणाची आत्महत्या
Published on

वरणगाव (जळगाव) : उत्तर प्रदेशातील तरुणाने वरणगाव परिसरातील महामार्गावरील हॉटेल वेस्टर्नजवळील एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२३ ऑक्‍टोंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. वरणगाव (Varangaon) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Live Marathi News)

Jalgaon News
Sugarcane Factory: पंढरपुरात रोखली ऊसतोड; संघर्ष समितीच्या कार्यकर्ते आक्रमक

सिधोर, प्रतापगड (उत्‍तर प्रदेश) येथील मसीर खान (वय १९) हा ट्रकवर क्लीनर म्हणून कामाला होता. तो (Gujrat) गुजरात - यवतमाळ ट्रकवरील चालकासोबत रविवारी दुपारच्या सुमारास जात असताना रात्री दीडच्या सुमारास हॉटेल वेस्टर्न येथे थांबून आराम केला. मात्र, सकाळी ट्रकचालक मोहम्मद ईसा लियाकत अली यांना मसीर खान हा तरुण दिसत नसल्याने त्याचा शोध घेतला.

अन्‌ तो आढळला मृतावस्‍थेत

शोध घेत असताना हॉटेलमोरील जितू त्र्यंबक झोपे यांचे शेतातील झाडावर फुलगाव शिवारात निंबाच्या झाडावर नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्या अवस्थेत आढळून आला. ट्रकचालक मोहम्मद ईसा लियाकत अली यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी मधुकर भालशंकर तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com