Beed Weather Forcast Saam TV
महाराष्ट्र

Beed Weather: बीडमध्ये पुढील चार दिवस उष्णतेची लाट; तापमान पोहचले ४३ अंशावर

Beed Temperature Today: गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात तापमान ४० ते ४३ डिग्रीपर्यंत असून आता हा तापमानाचा पारा अधिकच वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला.

विनोद जिरे

बीड : राज्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. राज्यातील काही शहरातील तापमान ४५ अंशापर्यंत गेले असून बीडमध्ये देखील पुढील चार दिवस तापमान ४३ अंशावर राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे बीडमध्ये देखील पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. 

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बीड (Beed) जिल्ह्यामध्ये आता तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात तापमान ४० ते ४३ डिग्रीपर्यंत असून आता हा तापमानाचा पारा अधिकच वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. आजपासून पुढील चार दिवस म्हणजे २५ मे पर्यंत बीड जिल्ह्यातील (Temperature) तापमान ४३ डिग्री सेल्सिअस असेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

काळजी घेण्याचे आवाहन

गेल्या दोन दिवसांपूर्वीच बीडच्या (Parali) परळी येथे उष्पघाताने भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला होता. आता तापमानाचा पारा अधिक वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान पुढील चार दिवस नागरिकांनी खबरदारी बाळगावी (Heat Wave) उष्माघात सारखा त्रास जाणवत असेल तर तात्काळ रुग्णालयात दाखल व्हावं, असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT