Shirur News Saam tv
महाराष्ट्र

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Beed News : गेल्या दोन पिढ्यापासून ही जमीन त्यांचे नातेवाईक व त्यांच्या नावे होती. असे असताना जोगदंड या वृद्ध दाम्पत्याची जमीन गायब झाल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : शासकीय कागदपत्रांमध्ये काय कारनामा होईल सांगता येणे कठीण आहे. अधिकारी परस्पर फेरफार करत असल्याचे पाहण्यास मिळत असते. त्यानुसार शिरूर तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याची दोन एकर नऊ गुंठे जमीन सातबारा वरून गायब करण्यात आल्याचा महाप्रताप तलाठी, मंडळ अधिकाऱ्याने केला आहे. या प्रकारामुळे शेतकरी दाम्पत्य संतप्त झाले आहे. 

बीडच्या शिरूर तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथील गट क्रमांक २४ मधील सुभद्रा दिनकर जोगदंड या वृद्ध आजीची वडीलोपार्जित दोन एकर नऊ गुंठे जमीन आहे. मात्र हि जमीन सातबारा वरून चक्क गायब झाली आहे. गेल्या दोन पिढ्यापासून ही जमीन त्यांचे नातेवाईक व त्यांच्या नावे होती. असे असताना जोगदंड या वृद्ध दाम्पत्याची जमीन गायब झाल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

आर्थिक देवाण घेवाण केल्याचा आरोप 

दरम्यान दोन पिढ्यापासून जमीन नावावर असताना मंडळ अधिकारी, तलाठी व तहसीलदार यांनी गावातील लोकांनी आर्थिक देवाण घेवाण करून ही जमीन चक्क सातबाऱ्या वरून कमी केली आहे. दोनही वयवृद्ध शेतकरी हे भोळसर असून त्यांच्या भोळसरपणाचा फायदा या मंडळाधिकारी, तलाठी आणि तहसीलदारांनी घेतल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे. अर्थात हा प्रकार नेमका काय आहे? हे समोर येईल.  

आत्मदहनाचा दिला इशारा 

सातबारा वरून जमीन गायब झाल्याने शेतकरी दाम्पत्य तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहे. तर माझी जमीन मला तात्काळ वापस करा; अन्यथा मी आत्महत्या करील आणि माझे जीवन संपवेल असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. मला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी दिनकर जोगदंड व सुभद्रा जोगदंड यांनी बोलताना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तयारी पूर्ण, उपोषणासाठी मंडप तयार

7 Days Stop Watching Reels: 7 दिवस रील्स न पाहिल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा अचानक यू-टर्न? आधी मनसेवर केले गंभीर आरोप, आता राज ठाकरेंचे मानले आभार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' महिलांना मिळणार नाही हप्ता; तुमचं यात नाव नाही ना?

एका दिवसात ATM मधून किती पैसे काढू शकतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT