Beed News Saam tv
महाराष्ट्र

३८ गावांचा वीज पुरवठा ५ दिवसांपासून खंडित; विद्युत सबस्टेशनचा शेतकऱ्यांनी घेतला ताबा

३८ गावांचा वीज पुरवठा ५ दिवसांपासून खंडित; विद्युत सबस्टेशनचा शेतकऱ्यांनी घेतला ताबा

विनोद जिरे

बीड : गेल्या 5 दिवसांपासून बीडच्या आष्टी तालुक्यातील 38 गावचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. यामुळे शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. संतप्‍त शेतकऱ्यांनी आष्टी (Ashti) तालुक्यातील अमिया टाकळी गावात असणाऱ्या विद्युत सबस्टेशनचा ताबा घेत आंदोलन केले. (Tajya Batmya)

बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील टाकळी आमियासह 38 गावतील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा गेल्या 5 दिवसांपासून 33 केव्ही उपकेंद्रामधून बंद केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी चक्क 33 केव्ही उपकेंद्राचा ताबा घेतला. विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करण्याची मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावेळी (MSEDCL) महावितरण अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचरण केले असून शेतकरी संतप्त झाले आहेत.

पाण्याअभावी पिके जळताय

यंदा पाऊस भरपूर झाल्याने पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र हे पाणी शेतीला देता येत नसल्याने पिके पाण्याअभावी जळून चालली आहे. दरम्यान तात्काळ विद्युत पुरवठा सुरू करा. अन्यथा इथून उठणार नाही; असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT